सर्वच महिला हातामध्ये बांगड्या घालतात. पूर्वीच्या काळापासून ते आत्तापर्यंत सर्वच महिलांच्या हातामध्ये बांगड्या आहेत. बांगड्या घातल्यामुळे हातांची शोभा वाढते आणि हात सुंदर दिसतात. कामानिमित्त बाहेर जाताना किंवा इतर वेळी सण समारंभाच्या दिवसांमध्ये महिला हातामध्ये वेगवेगळ्या डिझाईनच्या बांगड्या घालतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला ऑफिस वेअर मध्ये किंवा जीन्स, ड्रेसवर घालण्यासाठी सोन्याच्या बांगड्यांची सुंदर डिझाईन दाखवणार आहोत. चला तर पाहुयात.
हातामध्ये घाला सोन्याच्या नाजूक साजूक बांगड्या

डायमंड वर्क केलेल्या थोड्या हेवी बांगड्या घालायला तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही या डिझाईनच्या बांगड्या घालू शकता.

बांगड्या घालण्याऐवजी अनेक महिला कडे घालण्यास जास्त प्राधान्य देतात. त्यामुळे तुम्ही या डिझाईनचे कडे परिधान करू शकता.

मोठे मणी असलेले सुंदर कडे हातामध्ये खूप उठावदार दिसतात.

हिरव्या बांगड्याच्या मध्ये या डिझाईनच्या नाजूक साजूक बांगड्या तुम्ही घालू शकता. यामुळे तुमचे हात सुंदर दिसतील.

ऑफिसला जाताना किंवा इतर वेळी बाहेर जाताना तुम्ही या डिझाईनच्या बांगड्या परिधान करू शकता. यामुळे तुमचे हात सुंदर दिसतील.






