जेवल्यानंतर अनेकांना विड्याची पाने आणि त्यात सुपारी, तंबाखू मिक्स करून खाण्याची सवय असते. काही दिवसभरात एकदाच पान खातात तर काहींना दिवसभरात सतत पान खाण्याची सवय असते. विड्याची पाने खाल्ल्यास पचनक्रिया सुधारते आणि पचनाच्या कोणत्याही समस्या उद्भवत नाहीत. धावपळीच्या जीवनशैलीमुळे हृदयरोगाच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. हार्ट अटॅक, स्ट्रोक इत्यादी गंभीर आजारांचे रुग्ण वाढल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. या सर्व समस्यांपासून विड्याचे पान अतिशय प्रभावी ठरेल. जाणून घ्या फायदे. (फोटो सौजन्य – istock)
विड्याची पाने शरीरासाठी ठरतील वरदान! हृदयाच्या आजारांपासून ते अगदी मधुमेहापर्यंत सगळ्यांवर ठरेल प्रभावी

हृदयाची कार्यक्षमता कमी झाल्यानंतर शरीरात अनेक बदल दिसून येतात. या बदलांमुळे शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. त्यामुळे नियमित एक विड्याचे पान खाल्ल्यास शरीराला भरमसाट फायदे होतील.

विड्याच्या पानांना नागवेलीचे पान असे सुद्धा म्हंटले जाते. ही एक भारतीय पारंपरिक वनस्पती आहे. सर्व प्रकारच्या आजारांवर नागवेलीचे पान गुणकारी ठरते.

विड्याच्या पानांमध्ये बाष्पशील तेल, अमिनो ऍसिड ,कार्बोहायड्रेट, विविध जीवनसत्व, अँटिऑक्सिडेंट आणि दाहक विरोधी गुणधर्म मोठ्या प्रमाणावर आढळून येतात.

नागवेलीचे पान आणि खोबऱ्याच्या तेलाचा तांबूल म्हणून सुद्धा वापर केला जातो. ही औषधी वनस्पती शरीरासाठी कायमच प्रभावी ठरते. विड्याच्या पानांचे सेवन केल्यास अपचन होत नाही.

नागवेलीची पान चावून खाल्ल्यास पचन सुधारते, सर्दी-खोकला कमी होतो, मुरुम-डाग दूर होतात. कारण या पानांमध्ये अँटीऑक्सिडेंट व अँटीबॅक्टेरियल गुणधर्म आढळून येतात.






