राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) राजकारणात सक्रिय झाल्या आहेत. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी लढत होणार आहे. त्यामुळे या मतदारसंघात नेमकं कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.सुनेत्रा पवार या अजित पवारांच्या पाठीशी कायम खंबीरपणे उभ्या आहेत. अजित पवारांच्या राजकीय कारकीर्दीत त्यांना पत्नी सुनेत्रा यांनी मोठा पाठिंबा दिला आहे. सामाजिक कार्यात सुनेत्रा पवार नेहमीच सक्रिय असतात. सुनेत्रा पवार या इन्स्टाग्रामवर सक्रिय आहेत. त्यांच्या सोशल मीडियावर त्यांचे अनेक फोटो आहेत. त्यात त्यांनी नेसलेल्या साड्यांची सगळ्यांचं लक्ष वेधून घेतले आहेत. चला तर पाहुयात सुनेत्रा पवार यांच्या साड्यांचे अत्यंत क्लासी रॉयल लूक..
अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार त्यांच्या खांद्याला खांदा लावून राजकारणात पुन्हा एकदा सक्रिय झाल्या आहेत. सुनेत्रा पवार यांचे राहणीमान अत्यंत साधे आहे.
सुनेत्रा पवार यांच्याकडे अगदी पैठणी साड्यांपासून ते चंदेरी सिल्क पर्यंत सगळ्याचं फॅब्रिकमध्ये साड्या आहेत.
मिनिमल प्रिंट असणाऱ्या साड्या सर्वच महिलांना नेसायला आवडतात. कॉटनच्या साड्यांमध्ये अत्यंत लुक अधिक उठावदार दिसतो.
सुनेत्रा पवार यांच्या साड्या लक्षवेधी ठरल्या आहेत. त्यांनी नेसलेल्या प्रत्येक साडीची खास वैशिष्ट्य आहेत.
सुनेत्रा पवार यांच्या साड्यांचे कलेक्शन अत्यंत सुंदर आणि छान आहे. त्यांनी नेसलेल्या प्रत्येक साडीमध्ये स्टायलिश लुक दिसून येत आहे.