शरीरातील विषारी घटक लघवीवाटे बाहेर पडून जातात. पण बऱ्याचदा किडनीच्या कार्यात अडथळे निर्माण झाल्यानंतर शरीरात विषारी घटक बाहेर पडून जाण्याऐवजी शरीरात तसेच साचून राहतात. ज्यामुळे काहीवेळा लघवी करताना अतिशय तीव्र वेदना होणे, जळजळ होणे इत्यादी गंभीर समस्या उद्भवण्याची जास्त शक्यता असते. लघवीमध्ये इन्फेक्शन वाढण्यामागे अनेक कारणे आहेत. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला लघवीमध्ये वाढलेले इन्फेक्शन कमी करण्यासाठी कोणत्या हर्बल पेयांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. (फोटो सौजन्य – istock)
लघवी करताना सतत जळजळ होते? युरिन इन्फेक्शन टाळण्यासाठी आहारात करा 'या' हर्बल पेयांचे सेवन
लघवीमध्ये वाढलेले इन्फेक्शन कमी करण्यासाठी जिऱ्याच्या पाण्याचे सेवन करावे. रात्रभर कोमट पाण्यात जिरं भिजत ठेवावे. त्यानंतर सकाळी उठून उपाशी पोटी जिऱ्याचे पाणी प्यावे. यामुळे शरीरातील घाण बाहेर पडून जाईल.
जिऱ्याच्या पाण्याचे सेवन केल्यामुळे पचनक्रिया सुधारते, विषारी घटक बाहेर पडून जातात आणि शरीर स्वच्छ होते. सेलेरीमधील घटक जिऱ्यामध्ये असलेले थायमॉल संयुग बॅक्टेरियाना मारण्यास मदत करतात, ज्यामुळे संसर्गाचा धोका कमी होतो.
मूत्रमागात वाढलेली जळजळ कमी करण्यासाठी जिऱ्याचे पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. तसेच सेलेरी बियांच्या सेवनामुळे संसर्गकारक बॅक्टेरिया नष्ट होऊन शरीर स्वच्छ होते.
जिऱ्याच्या पाण्यासोबतच तुम्ही सेलेरीचा सुद्धा रस पिऊ शकता. यामध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आढळून येतात. सेलेरीच्या पानांचा रस प्यायल्यामुळे मूत्रमार्ग स्वच्छ होतो.
पोटात साचून राहिलेल्या विषारी वायूमुळे वारंवार ऍसिडिटी किंवा अपचनाची समस्या उद्भवते. त्यामुळे शरीर नैसर्गिक डिटॉक्स करण्यासाठी जिरं किंवा सेलेरीच्या पानांचा रस प्यावा.