आवळा खाणे आरोग्यासाठी वरदान मानले जाते. सकाळी उठल्यानंतर किंवा इतर वेळी आवळ्याचे सेवन केल्यास शरीराला भरमसाट फायदे होतात. चवीला आंबट आणि तुरट चवीचा आवळा खायला सगळ्यांचं खूप जास्त आवडतो. आवळ्याचं लोणचं, चटणी किंवा सरबत इत्यादी अनेक अनेक पदार्थ आवळ्यापासून बनवले जातात. त्यामुळे रोज नियमित एक आवळा खावा. आवळ्यामध्ये असलेले विटामिन सी आणि इतर पोषक घटक केसांच्या मुळांना पोषण देतात. चला तर आणून घेऊया आवळ्याचे सेवन केल्यामुळे शरीराला होणारे फायदे. (फोटो सौजन्य – istock)
सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी करा आवळ्याचे रसाचे सेवन

आवळ्याचे सेवन केल्यामुळे शरीराची कमकुवत झालेली रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत होते. यामध्ये असलेल्या विटामिन सी मुळे शरीरात पांढऱ्या पेशी वाढतात. याशिवाय अँटीऑक्सिडंट्स घटक ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करतात.

आवळ्याच्या सेवनामुळे अपचन, बद्धकोष्ठता, आम्लपित्त आणि वायू यांसारख्या समस्या उद्भवत नाही. कारण यामध्ये असलेल्या फायबरमुळे पोटाचे आरोग्य सुधारते आणि पचनक्रिया निरोगी राहते.

चेहऱ्यावर वाढलेले पिंपल्स, मुरूम आणि मोठे फोड कमी करण्यासाठी आवळ्याचे सेवन करावे., आवळ्याच्या सेवनामुळे चेहऱ्यावर चमकदार ग्लो येतो. तसेच केसांची मूळ मजबूत राहतात.

वाढलेले वजन कमी करताना अनेक वेगवेगळ्या पेयांचे सेवन केले जाते. पण सकाळी उठून आवळ्याच्या रसाचे सेवन केल्यास वाढलेलं वजन कमी होऊन शरीर स्लिम दिसेल. यामुळे शरीरात अनावश्यक फॅट वाढत नाहीत.

रक्तात वाढलेली साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी आवळ्याचा रस प्यावा. यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. तसेच यामुळे शरीरातील इन्सुलिन संवेदनशीलता सुधारते.






