शरीर दीर्घकाळ निरोगी राहण्यासाठी शरीराला सर्वच विटामिनची आवश्यकता असते. विटामिन सी, ए, ई, लोह, मॅग्नेशियम इत्यादी अनेक घटक शरीरासाठी आवश्यक आहे. त्यातील अत्यंत महत्वाचा घटक म्हणजे मॅग्नेशियम. शरीरात मॅग्नेशियमची कमतरता निर्माण झाल्यानंतर थकवा, अशक्तपणा वाढू लागतो. याशिवाय नसा दुखणे, हाडांमध्ये वाढलेल्या वेदना, हृदयाच्या आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते. रोजच्या आहारात प्रक्रिया केलेल्या अननपदार्थांचे अतिसेवन केल्यामुळे आरोग्य बिघडते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला मॅग्नेशियमची कमतरता भरून काढण्यासाठी कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. (फोटो सौजन्य – istock)
Magnesium ची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात करा 'या' पदार्थांचे सेवन

सकाळी उठल्यानंतर नियमित बदाम खावेत. बदाम खाल्यामुळे मेंदूचे आरोग्य सुधारते आणि शरीरात मॅग्नेशियम वाढतात. मेंदू आणि नसांच्या आरोग्यासाठी नियमित मूठभर बदाम खावेत.

चॉकलेट खायला सगळ्यांचं खूप जास्त आवडते. पण साखरयुक्त चॉकलेटचे सेवन करण्याऐवजी डार्क चॉकलेट खावे. डार्क चॉकलेटमध्ये सुमारे ६४ मिलीग्राम मॅग्नेशियम असते.

सकाळच्या नाश्त्यात एवोकॅडो सँडविच किंवा एवोकॅडो सॅलड खावे. यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. एवोकॅडोमध्ये निरोगी चरबी आणि मॅग्नेशियम मोठ्या प्रमाणावर आढळून येते.

मधुमेह झालेल्या रुग्णांनी आहारात ब्राऊन राईसचे सेवन करावे. याशिवाय ब्राऊन राईसमध्ये ८४ मिलीग्राम मॅग्नेशियम आढळून येते.

लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं दही खायला खूप जास्त आवडते. दुपारच्या जेवणात नियमित वाटीभर दह्याचे सेवन करावे.






