शरीराचे कार्य निरोगी ठेवण्यासाठीच आहारात पौष्टिक पदार्थांचे सेवन करणे गरजेचे आहे. कारण जीवन जगण्यासाठी शरीराला प्रोटीन आणि विटामिनची आवश्यकता असते. शरीरात प्रोटीनची कमतरता निर्माण झाल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवतात. शरीरात विटामिन बी १२ ची कमतरता निर्माण झाल्यानंतर मेंदूच्या नसांना त्रास होण्यास सुरुवात होते. मेंदूचे कार्य बिघडल्यानंतर संपूर्ण शरीराचे कार्य बिघडून जाते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला शरीरात विटामिन बी १२ ची कमतरता निर्माण झाल्यानंतर आहारात कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया. (फोटो सौजन्य-istock)
विटामिन बी १२ ची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात करा या पदार्थांचे सेवन
मशरूममध्ये प्रोटीन, कॅल्शियम आणि लोह मुबलक प्रमाणात आढळून येते. ज्यामुळे शरीरात निर्माण झालेली विटामिन बी १२ ची पातळी वाढण्यास मदत होते.
माश्यांमध्ये मुबलक प्रमाणात विटामिन बी १२ आढळून येते. त्यामध्ये तुम्ही सॅल्मन मासा खाऊ शकता. या माशामध्ये ओमेगा-३ फॅटी ॲसिड आणि प्रथिने आणि इतर जीवनसत्वे आढळून येतात.
सकाळी उठल्यानंतर नियमित २ किंवा ३ अंडी खावीत. अंड्यांमध्ये विटामिनचा चांगला स्रोत आढळून येतो. ४६ टक्के विटामिन शरीराला अंड्यांमधून मिळते.
ब्रोकोली शरीरातील विटामिन बी १२ ची कमी झालेली पातळी भरून काढण्यास मदत करते. तसेच ब्रोकोलीमध्ये चांगले फॅट आढळून येतात.
वाढलेले वजन कमी करण्यासाठी ओट्स खाल्ले जातात. मात्र ओट्स संपूर्ण आरोग्य सुधारण्यासाठी अतिशय गुणकारी आहेत. ओट्सचे सेवन केल्यामुळे शरीरातील विटामिन बी १२ ची पातळी वाढण्यास मदत होते.