जगभरात कर्करोगाचे अनेक रुग्ण आहे. कर्करोगाचे नाव ऐकल्यानंतर सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकते. त्यामुळे स्वतःच्या आरोग्याची जास्त काळजी घेणे आवश्यक आहे. बऱ्याचदा शरीरात होणारे बदल लवकर दिसून येत नाहीत, त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करणे आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला कर्करोगासारख्या गंभीर आजारापासून शरीराचा बचाव करण्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. यामुळे शरीरात वाढलेल्या कर्करोगाच्या पेशी नष्ट होण्यास मदत होते. (फोटो सौजन्य – iStock)
कर्करोगासारख्या गंभीर आजारांपासून शरीराचा बचाव करण्यासाठी आहारात करा 'या' पदार्थांचे सेवन
स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी आणि रास्पबेरी इत्यादी पदार्थांचे रोजच्या आहारात सेवन करावे. या पदार्थांच्या सेवनामुळे शरीर कायम निरोगी राहील. याशिवाय बेरिजमध्ये अँटीऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणावर आढळून येतात.
आपल्यातील अनेकांना ब्रोकोली खायला आवडत नाही. पण ब्रोकोली खाल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. या भाजीमध्ये ग्लुकोसिनोलेट्स नावाचा घटक आढळून येतो ज्यामध्ये कर्करोगाशी लढणाऱ्या एंजाइम भरपूर
जेवणाची चव वाढवण्यासाठी आहारात लसूण खाल्ली जाते. लसूणचे सेवन केल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे. शरीरात निर्माण झालेल्या कर्करोगाच्या पेशी नष्ट करण्यासाठी आहारात लसूण खावी.
भारतीय स्वयंपाक घरात हळद हा पदार्थ सगळ्यांकडेच असतो. जेवणातील डाळ, भाजी, इतर पदार्थ तयार करताना हळदीचा वापर केला जातो. हळदीमध्ये कर्क्युमिन, दाहक-विरोधी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म आढळून येतात.
काजूंमध्ये निरोगी चरबी, फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे भरपूर प्रमाणात आढळून येतात. त्यामुळे रोजच्या आहारात एक किंवा दोन काजूचे नियमित सेवन करावे.