सकाळी उठल्यानंतर बऱ्याचदा शरीरात थकवा, अशक्तपणा जाणवू लागतो. याशिवाय अंग आखडून जाते. कोणतेही काम करण्याची इच्छा होत नाही. स्नायूंमधील ताकद कमी झाल्यानंतर आरोग्यासंबंधित बऱ्याच समस्या उद्भवतात. घाईगडबडीच्या वेळी अनेक लोक सकाळचा नाश्ता न करता बाहेर निघून जातात आणि नाश्त्यात तेलकट पदार्थांचे सेवन केले जाते. पण वारंवार तिखट आणि तेलकट पदार्थ खाल्यामुळे स्नायूंमध्ये थकवा वाढतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी आहारात कोणत्या हाय प्रोटीन पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या पदार्थांच्या सेवनामुळे शरीराला अनेक फायदे होतील. (फोटो सौजन्य – istock)
स्नायूंमध्ये वाढलेला थकवा- अशक्तपणा दूर करण्यासाठी आहारात करा 'या' High-Protein पदार्थांचे सेवन
शरीराची कमी झालेली ऊर्जा वाढवण्यासाठी नियमित दोन किंवा तीन अंडी खावीत. अंड्याच्या आतील पिवळ्या भागाचे सेवन करू नये. अंड्यांमध्ये असलेले गुणकारी घटक शरीराला ऊर्जा देतात.
सगळ्यांचं आंबट गोड दही खायला खूप जास्त आवडते. ग्रीक दह्यामध्ये नेहमीच्या दह्यापेक्षा खूप जास्त प्रथिने आढळून येतात. ग्रीक दह्यात तुम्ही वेगवेगळी फळे मिक्स करून खाऊ शकता.
लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं पनीर खायला खूप जास्त आवडते. पनीरपासून अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. हा पदार्थ हळूहळू पचन होतो आणि पनीर खाल्यामुळे लवकर भूक लागत नाही.
ओट्समध्ये भरपूर प्रमाणात फायबर आणि कॉम्प्लेक्स कार्ब असतात, ज्यामुळे शरीरात ऊर्जा कायम टिकून राहते. सकाळच्या नाश्त्यात तुम्ही मसाला ओट्स किंवा फळे घालून बनवलेले ओट्स खाऊ शकता.
सकाळच्या घाईगडबडीमध्ये काम करण्यासाठी जास्त वेळ मिळत नाही. अशावेळी तुम्ही फळांचा वापर करून स्मूदी बनवू शकता. स्मूदी सगळ्यांचं खूप आवडते.