भारतीय पदार्थ जगभरात सगळीकडे फेमस आहेत. कारण घरगुती आणि पोषक तंत्वानी समृद्ध असलेल्या पदार्थांचा वापर करून वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. वजन वाढू नये म्हणून आहारात फायबरयुक्त आणि सहज पचन होणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे. दैनंदिन आहारात तिखट किंवा अतितेलकट पदार्थांचे सेवन न करता अतिशय हलक्या पदार्थांचे सेवन करावे. आज आम्ही तुम्हाला कायमच निरोगी राहण्यासाठी आहारात कोणत्या भारतीय पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – istock)
कायमच हेल्दी आणि ठणठणीत राहण्यासाठी आहारात करा 'या' भारतीय पदार्थांचे नियमित सेवन
वेगवेगळ्या भाज्या आणि दलियाचा वापर करून बनवलेला उपमा चवीला आरोग्यासाठी खूप जास्त पौष्टिक आहे. भारतीय लोक सकाळच्या नाश्त्यात किंवा जेवणात सुद्धा दलियाचें सेवन करतात.
जेवणाच्या डब्यात कायमच दिला जाणारा पदार्थ म्हणजे चपाती भाजी. सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा इतर वेळी चपाती भाजी खाल्यास पोट जास्त वेळ भरलेले राहते.
बेसन चिला आणि ओल्या खोबऱ्याची चटणी चवीला अतिशय सुंदर लागते. सकाळच्या नाश्त्यात अतिशय हलके पदार्थ खायचे असल्यास तुम्ही बेसन चिला किंवा मुगाच्या डाळीचे धिरडे बनवू शकता.
दक्षिण भारतात तांदूळ आणि उडीद डाळीपासून बनवली जाणारी इडली मोठ्या प्रमाणावर खाल्ली जाते. पौष्टिक पदार्थांच्या यादीमध्ये चौथ्या क्रमांकावर इडलीचे सेवन केले जाते.
तुपाची फोडणी आणि भरपूर भाज्यांचा वापर करून बनवलेली डाळ खिचडी चवीला अतिशय सुंदर लागते. लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं डाळ खिचडी खायला खूप जास्त आवडते.