स्नायूंमधील ऊर्जा कमी झाल्यानंतर आरोग्यावर गंभीर परिणाम दिसून येतात. बऱ्याचदा जिमला गेल्यानंतर अनेक लोक तासनतास व्यायाम करतात. पण चुकीचा आहार घेतल्यामुळे आरोग्य बिघडण्याची जास्त शक्यता असते. स्नायूंच्या वाढीसाठी आहारात प्रथिने, कार्बोहायड्रेट्स आणि निरोगी चरबी असणे अतिशय महत्वाचे आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला स्नायूंमधील ऊर्जा वाढवण्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. आहारात प्रथिनेयुक्त पदार्थांचे सेवन केल्यास शरीर दीर्घकाळ निरोगी राहते. (फोटो सौजन्य – istock)
स्नायूंच्या वाढीसाठी रोजच्या आहारात करा 'या' प्रथिनेयुक्त पदार्थांचे सेवन
स्नायूंच्या वाढीसाठी आहारात उकडलेली अंडी खावीत. अंड्यांमध्ये उच्च दर्जाचे प्रथिने, निरोगी चरबी आणि विटामिन बी १२ आणि विटामिन डी इत्यादी अनेक आवश्यक घटक आढळून येतात. अंड्याच्या वरील पांढरा भाग खाल्यास शरीराला ऊर्जा मिळेल.
लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं चिकन खायला खूप जास्त आवडते. त्यामुळे दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणात चिकन ब्रेस्ट खाऊ शकता. १०० ग्रॅम चिकन ब्रेस्टमध्ये सुमारे ३०-३५ ग्रॅम प्रथिने आढळून येतात.
दह्यामध्ये प्रोबायोटिक्स मोठ्या प्रमाणावर आढळून येतात, ज्यामुळे शरीराची पचनक्रिया निरोगी राहते. दह्यामध्ये कॅल्शियम आढळून येते, ज्यामुळे हाडे मजबूत राहतात.
पोटॅशियम युक्त केळी खाल्यास शरीरातील ऊर्जा कायमच टिकून राहील. केळीमध्ये नैसर्गिक साखर आणि पोटॅशियम असते, ज्यामुळे व्यायामानंतर उर्जेची पातळी कायमच टिकून राहते.
शेंगदाण्याचा वापर जेवणातील अनेक पदार्थ बनवताना केला जातो. यामध्ये मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स आणि फायबर आढळून येते, ज्यामुळे हृदयाचे आरोग्य निरोगी राहते.