उन्हाळा वाढल्यानंतर शरीराची पचनक्रिया बिघडण्याची जास्त शक्यता असते. कारण वाढत्या उष्णतेचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे उन्हाळ्यात शरीरास पचन होणाऱ्या हलक्या आणि पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. उन्हाळा वाढल्यानंतर आहारात पालेभाज्यांचे सेवन करावे. कारण पालेभाज्या सहज पचन होतात. त्यामुळे आहारात लाल माठ, मेथी, पालक, चवळी इत्यादी अनेक पालेभाज्यांचे सेवन करावे. उन्हाळ्यात लाल माठाच्या भाजीचे जास्त प्रमाणात सेवन करावे. तांदळाची भाकरी किंवा भातासोबत लाल माठाची भाजी अतिशय चविष्ट लागते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला लाल माठ खाल्यामुळे आरोग्याला नेमके काय फायदे होतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – iStock)
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आहारात करा 'या' लाल भाजीचे सेवन
लाल माठाच्या भाजीमध्ये भरपूर प्रमाणात लोह आणि अँटीअक्सिडेंट आढळून येते. त्यामुळे नियमित आहारात एक तरी पालेभाजी खावी, ज्यामुळे पचनक्रिया सुधारून शरीराला कोणतीही हानी होणार नाही.
रक्तातील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी आहारात लाल माठाच्या भाजीचे सेवन करावे. रक्ताची कमतरता निर्माण झाल्यानंतर सतत थकवा आणि अशक्तपणा जाणवू लागतो. या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी लाल माठाची भाजी खावी.
लाल माठाच्या भाजीमध्ये बायोएक्टिव्ह कंपाऊंड्स,अँथोसायनिन्स मोठ्या प्रमाणात आढळून येतात. यामुळे शरीरातील पेशींचे रक्षण होते. याशिवाय त्वचेची गुणवत्ता सुधारते.
डोळ्यांची खराब झालेली दृष्टी सुधरण्यासाठी लाल माठाच्या भाजीचे नियमित सेवन करावे. ही भाजी डोळ्यांची दृष्टी चांगली ठेवते. याशिवाय यामध्ये विटामिन ए मोठ्या प्रमाणावर आढळून येते.
लाल माठाच्या भाजीमध्ये असलेला थंडावा शरीरातील उष्णता कमी करतो. त्यामुळे वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी आहारात लाल माठाची भाजी खावी.