जेवणाच्या ताटात मासे पाहिल्यानंतर सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटते. माशांचे जेवण असले की चार घास जास्त जातात. पण अनेक लोक माशांमध्ये असलेल्या काट्यांमुळे मासे खाण्याचा कंटाळा करतात आणि तर अनेकांना भीती सुद्धा वाटते. बाजारात अनेक विविध प्रजातींचे मासे सहज उपलब्ध होतात. मासे खाल्ल्यामुळे शरीराला खूप जास्त फायदे होतात. त्यामुळे दैनंदिन आजारात माशांचे सेवन करावे. मासे खाल्ल्यामुळे हृदय आणि मेंदूचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. चला तर जाणून घेऊया मासे खाल्ल्यामुळे शरीराला होणारे फायदे. (फोटो सौजन्य – istock)
आठवड्यातून दोनदा माशांचे सेवन केल्यास शरीराला होतील आश्चर्यकारक फायदे, सुधारेल हाडांचे आरोग्य

माशांमध्ये चांगले फॅट्स आणि आवश्यक पोषक घटक आढळून येतात, जे हृदयाच्या आरोग्यासाठी अतिशय चांगले आहेत. यामुळे मेंदूचे कार्य सक्रिय राहते आणि स्मरणशक्ती सुधारते.

माशांमध्ये असलेल्या पोषक घटकांमुळे शरीराचे वजन नियंत्रित राहते आणि हाडे मजबूत राहतात. माशांमधील ओमेगा-3 फॅटी ॲसिड हृदयाचे आरोग्य कायमच निरोगी ठेवते.

शरीरात वाढलेले खराब कोलेस्ट्रॉल बाहेर काढून टाकण्यासाठी आहारात माशांचे सेवन करावे. आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा मासे खाल्ल्यास रक्तप्रवाह सुरळीत चालू राहतो.

माशांमधील चांगली पोषक तत्वे मेंदूच्या विकासासाठी आणि स्मरणशक्तीसाठी फायदेशीर ठरतात. त्यामुळे आहारात सुरमई, बांगडा, कोळंबी, रावस, हलवा, पापलेट इत्यादी माशांचा आहारात समावेश करावा.

हाडांची कमी झालेली ताकद पुन्हा नव्याने वाढवण्यासाठी माशांचे सेवन करावे. मासे खाल्ल्यामुळे हाडे मजबूत राहतात आणि स्नायूंमधील ऊर्जा वाढण्यास मदत होते.






