इंडियन प्रीमियर लीग 2024चा (Indian Premier League 2024) 62वा सामना काल रंगला. यामध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Royal Challengers Bengaluru) आणि दिल्ली कॅपिटल्स (Dinesh Karthik) यांच्यामध्ये लढत पाहायला मिळाली. आयपीएल केवळ चौकार आणि षटकारांसाठी लोकप्रिय नाही. यामध्ये क्रिकेट चाहत्यांची उत्सुकता कायम ठेवणारे असे विक्रम दररोज बनतात आणि मोडतात. त्यामुळे अनेक असे आगळेवेगळे विक्रम सुद्धा पाहायला मिळतात. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामन्यात दिनेश कार्तिकनेही (Dinesh Kartik) एक विक्रम केला, ज्याला आपण अनेकदा ‘नको असलेला’ टॅग देतो. जणू घ्या नक्की कोणता विक्रम दिनेश कार्तिकने केला आहे.
आयपीएल 2024चा आरसीबी विरुद्ध दिल्ली यांच्यामध्ये सामना झाला, या सामन्यात बंगळुरूने दिल्ली कॅपिटल्सचा 47 धावांनी पराभव केला. कालच्या बंगळुरूच्या विजयासह दिल्ली आणि बंगळुरूचे गुणतालिकेत सामान 12-12 गुण झाले आहेत.
दिल्ली विरुद्ध बंगळुरू या सामन्यांमध्ये दिनेश कार्तिकने हा विक्रम केल्याने रोहित शर्माला नक्कीच आनंद झाला असेल कारण त्याचे नाव या ‘नको असलेल्या रेकॉर्ड’मधून काढून टाकण्यात आले आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध 9 विकेट्स गमावले. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने दिल्लीला 187 धावांचे लक्ष दिले होते. परंतु या सामन्यात आरसीबीचे तीन फलंदाज दिनेश कार्तिक, स्वप्नील सिंग आणि मोहम्मद सिराज यांना खातेही उघडता आले नाही.
दिनेश कार्तिकच्या या रेकॉर्डमुळे सर्वाधिक वेळा 0 धावांवर बाद होण्याच्या बाबतीत दिनेश कार्तिकने रोहित शर्मा आणि मॅक्सवेलला मागे टाकले आहे. अशाप्रकारे हा नकोसा विक्रम एकट्या दिनेश कार्तिकच्या नावावर झाला आहे.
आयपीएलमधील ही १८वी वेळ होती जेव्हा दिनेश कार्तिक शून्यावर बाद झाला होता. रोहित शर्मा आणि ग्लेन मॅक्सवेल आयपीएलमध्ये 17-17 वेळा आउट झाले आहेत. आरसीबी-दिल्ली सामन्यापूर्वी दिनेश कार्तिकही रोहित-मॅक्सवेलच्या बरोबरीने होता.