घाईगडीबडीच्या वेळी अनेकांना अतिशय सोप्या पद्धतीमध्ये स्वयंपाक बनवायचा असतो. कमीत कमी साहित्य आणि मसाल्यांचा वापर करून बनवलेले पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतात. पालेभाज्या किंवा इतर फळभाज्या शिजवताना अनेक वेगवेगळ्या पद्धती
'या' भाज्या शिजवताना चुकूनही करू नका पाण्याचा वापर
कारल्याची भाजी शिजवताना त्यात अजिबात पाणी घालू नये. ही भाजी वाफेवर शिजवावी. कारण कारल्याच्या भाजीमध्ये पाणी टाकल्यामुळे भाजी अतिशय चिकट आणि बेचव लागते.
आपल्यातील अनेकांना शिमला मिरची खायला आवडत नाही. त्यामुळे शिमला मिरचीचा वापर आमटी किंवा इतर पदार्थ बनवताना केला जातो. शिमला मिरची शिजवताना त्यात पाणी टाकल्यास भाजीच्या कुरकुरीतपणावर, सुगंधावर आणि रंगावर परिणाम होतो.
लोहयुक्त पालकचे सेवन केल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. पण पालकची भाजी कधीच पाणी घालून शिजवू नये. यामुळे भाजीची चव खराब होऊन जाते. तसेच भाजीमध्ये पोषक घटक नष्ट होतात.
कोबीच्या भाजीमध्ये भरपूर पाणी असते. त्यामुळे भाजी शिजवताना तिला पाणी सुटते. भाजीला सुटलेल्या पाण्यातच कोबीची भाजी शिजवावी. यामध्ये जास्तीचे पाणी घालू नये.
भेंडीची भाजी शिजवताना त्यातून चिकट द्रव पदार्थ बाहेर पडतो. त्यामुळे जर भेंडीच्या भाजीत पाणी घातले तर भाजी आणखीनच चिकट आणि गिळगिळीत होऊन जाते.