हल्ली महिलांसह पुरुषांमध्ये केस गळतीची समस्या वाढू लागली आहे. केस गळण्यास सुरुवात झाल्यानंतर महिला दुर्लक्ष करतात. पण असे केल्यामुळे केसांमध्ये टक्कल पडण्याची भीती असते. केसांसंबधित समस्या उद्भवू लागल्यानंतर महिला बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या शॅम्पू किंवा सीरमचा वापर केला जातो. पण यामुळे सुद्धा केसांमध्ये कोणताच फरक दिसून येत नाही. आहारात खाल्लेल्या हानिकारक पदार्थांचा थेट परिणाम केसांच्या आरोग्यावर सुद्धा दिसून येतो. त्यामुळे आहारात या पदार्थांचे अजिबात सेवन करू नये. जाणून घ्या सविस्तर. (फोटो सौजन्य – istock)
चुकूनही करू नका 'या' पदार्थांचे सेवन! केसांमध्ये पडेल टक्कल
गोड पदार्थांचे सेवन केल्यामुळे वजनच नाहीतर केस गळती, त्वचा खराब होणे, त्वचा कोरडी पडणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. त्यामुळे आहारात कमीत कमी साखरेचे सेवन करावे.
लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं पिझ्झा, पास्ता, बर्गर खायला खूप जास्त आवडतो. पण हे पदार्थ आरोग्यासाठी हानिकारक आहे. या पदार्थांमध्ये ट्रान्स फॅट आणि सेच्युरेटेड फॅट मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. ज्यामुळे केसांच्या मुळांना पोषण मिळत नाही.
काहींना खूप जास्त चटपटीत पदार्थ खायला आवडतात. जास्त मिठाचे सेवन केल्यामुळे शरीरात अनेक बदल दिसून येतात. अंगाला सूज येणे, अचानक केस गळणे इत्यादी लक्षणे दिसू लागल्यास आहारात कमीत कमी मीठ खावे.
दारूचे अतिसेवन केल्यामुळे शरीराला हानी पोहचते. लिव्हर खराब होऊन संपूर्ण शरीरावर त्याचे परिणाम दिसून येतात. त्यामुळे दारूचे सेवन करू नये. दारूच्या सेवनामुळे केस खूप जास्त कोरडे होतात.
बाजारात डेअरी प्रॉडक्ट मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत. या पदार्थांमध्ये जास्त फॅट असते. यामुळे केसांची वाढ होत नाही आणि केसांच्या मुळांना पोषण मिळत नाही.