भारतातील ताजमहाल हा जगातील सात आश्चर्यांपैकी एक आहे. पांढऱ्या संगमरवरापासून बनलेला हा एक विशाल मकबरा आहे, ज्याला मुघल सम्राट शाहजहानने आपली पत्नी मुमताज हिच्या स्मरणार्थ बांधले होते. भारतातील सर्वात प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी हे एक ठिकाण आहे. ताजमहालचा इतिहास तर संपूर्ण जगभर प्रसिद्ध आहे मात्र तुम्हाला माहिती आहे का? पाकिस्तानातही एक ताजमहाल आहे, जो हुबेहूब भारताच्या ताजमहालप्रमाणेच दिसतो.
Pakistan's Taj Mahal: भारताप्रमाणेच पाकिस्तानातही आहे हुबेहूब ताजमहाल, कथाही सेम टू सेम; फोटो पाहूनच डोळे दीपतील
पाकिस्तानच्या ताजमहालची रचना भारताच्या ताजमहालासारखीच आहे. एवढेच काय तर याची कथाही सारखीच आहे. वास्तविक, अब्दुल रसूलने आपल्या पत्नीच्या स्मरणार्थ याला बांधले होते
मुघल सम्राट शाहजहानने पत्नी मुमताजच्या मृत्यूनंतर तिच्या स्मरणार्थ ताजमहाल बांधला. तसेच अब्दुल रसूलचे पत्नी मरियमवर खूप प्रेम होते. अब्दुल मरियमपेक्षा 22 वर्षांनी लहान होता
वयाच्या 18 व्या वर्षी अब्दुलने 40 वर्षीय मरियमशी लग्न केले. त्यांच्या प्रेमाची कथा संपूर्ण पाकिस्तानात प्रसिद्ध होती. पत्नीच्या मृत्यूनंतर त्यांनी तिच्या स्मरणार्थ एक इमारत बांधण्याचा निर्णय घेतला
अब्दुलने आपल्या प्रेमाची ही निशाणी अवघ्या काही महिन्यताच बनवली. वृत्तांवर विश्वास ठेवला तर, पत्नीच्या कबरीवर ताजमहालसारखा दिसणारा मकबरा बांधण्यात आला
पाकिस्तानातील हा ताजमहाल बनवण्यासाठी 12-15 लाख खरंच करण्यात आला होता. पाकिस्तानातील उमरकोटला ही वास्तू तयार करण्यात आली आहे