वाढलेले वजन कमी करण्यासाठी आणि निरोगी आरोग्यासाठी अनेक लोक सकाळी उठल्यानंतर व्यायाम आणि योगासने करण्याची सवय असते. व्यायाम आणि योगासने केल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. मात्र बरेच लोक व्यायाम किंवा वर्कआऊट करून आल्यानंतर कोणत्याही पदार्थांचे सेवन करतात. वर्कआऊट करून भूक लागल्यानंतर कोणत्याही पदार्थांचे सेवन केले जातात, ज्यामुळे आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला वर्कआऊट केल्यानंतर कोणत्या पदार्थांचे सेवन करू नये, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – iStock)
व्यायाम किंवा वर्कआऊट केल्यानंतर आहारात चुकूनही करू नका 'या' पदार्थांचे सेवन
नैसर्गिक वाटणारा फळांचा रस वर्कआऊट करून आल्यानंतर लगेच पिऊ नये. यामध्ये असलेली नैसर्गिक साखर रक्तामध्ये लगेच मिक्स होऊन जाते. ज्यामुळे वाढलेले वजन कमी करण्यासाठी अनेक अडथळे येतात.
फ्लेवर्ड दही बनवण्यासाठी साखरेचा वापर केला जातो. या दह्यामध्ये असलेले घटक वजन कमी करण्याच्या प्रक्रियेमध्ये अडथळा निर्माण करतात. त्यामुळे आहारात फ्लेवर्ड दह्याचे सेवन करू नये. त्याऐवजी साधे किंवा घरी बनवलेले दही खावे.
कडधान्य आणि तृणधान्य आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहेत. या धान्यांचे सेवन केल्यामुळे शरीराची ऊर्जा वाढते. मात्र वर्कआऊट किंवा व्यायाम करून आल्यानंतर लगेच धान्यांचे सेवन करू नये. यामुळे पचनसंस्था बिघडू शकते.
व्यायाम करून आल्यानंतर पॅकिंग पदार्थांचे सेवन करणे टाळावे. पॅकिंग पदार्थ तयार करण्यासाठी तेलाचा आणि इतर पदार्थांचा वापर केला जातो, जे पदार्थ आरोग्याच्या दृष्टीने अतिशय हानिकारक आहेत.
वर्कआऊट किंवा व्यायाम करून आल्यानंतर केक, कुकीज, पांढरा ब्रेड, पाव, इत्यादी बेकरी प्रॉडक्ट्सचे सेवन करू नये. यामध्ये जास्त प्रमाणात मैदा आणि साखरेचा वापर केला जातो. अतिप्रमाणात मैद्याच्या पदार्थांचे सेवन करणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.