शरीराची पचनक्रिया बिघडल्यानंतर चेहऱ्यावर त्याचे परिणाम लगेच दिसून येतात. पिंपल्स येणे, बारीक मुरूम येणे, त्वचा काळवंडून जाणे, फोड येणे इत्यादी अनेक समस्या उद्भवतात. त्यामुळे आतड्यांचे आरोग्य कायमच चांगले असणे आवश्यक आहे. आतड्यांच्या साचून राहिलेल्या विषारी घाणीचा परिणाम त्वचेवर लगेच दिसून येतो. म्हणूनच आज आम्ही त्वचा नैसर्गिकरित्या सुंदर आणि चमकदार ठेवण्यासाठी कोणत्या पेयांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. (फोटो सौजन्य – istock)
चेहऱ्यावरील ग्लो कायम टिकवून ठेवण्यासाठी नियमित प्या 'हे' चविष्ट पेय

सकाळी उठल्यानंतर नियमित गाजर बीटच्या रसाचे सेवन करावे. यामध्ये असलेल्या बीटा-कॅरोटीन, विटामिन ए आणि विटामिन सी मुळे त्वचेवर चमकदार ग्लो येतो. तसेच यामध्ये असलेल्या कोलेजनमुळे त्वचा खूप जास्त चमकदार होते.

चेहऱ्यावरील हरवलेली चमक वाढण्यासाठी बीट, डाळिंबाच्या रसाचे सेवन करावे. डाळिंब रक्तातील घाण बाहेर काढून टाकण्यासाठी मदत करते. तसेच शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी नियमित बीट, डाळिंबाचा रस प्यावा.

हिरव्या पालेभाज्यांचे सेवन केल्यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. चेहऱ्यावर वाढलेल्या सुरकुत्या, पिंपल्स आणि काळे डाग कमी करण्यासाठी पालक, किवीच्या रसाचे सेवन करावे. यामुळे त्वचेचा काळवंडलेला रंग सुधारतो.

टोमॅटोमध्ये लायकोपिन नावाचे अँटीऑक्सिडंट घटक मोठ्या प्रमाणावर आढळून येतात, ज्यामुळे सूर्याच्या हानिकारक किरणांपासून त्वचेचे रक्षण होते. चेहऱ्यावर वाढलेला टॅन कमी करण्यासाठी टोमॅटो, कोथिंबिरीचा रस प्यावा.

शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी आणि शरीरात कायम थंडावा टिकवून ठेवण्यासाठी काकडी, लिंबू आणि पुदिन्याच्या रसाचे सेवन करावे. या रसाच्या सेवनामुळे त्वचा उजळदार होते.






