मराठी असो वा हिंदी मालिका एक अशी गुणी अभिनेत्री जिने आपल्या अभिनयाची छाप पाडली. मालिकाच नाही तर जाहीरातींमधून देखील ती घराघरात पोहोचली ही मराठमोळी अभिनेत्री म्हणजे सुकन्या सुर्वे. सुपरस्टार अक्षय कुमारबरोबर सुद्धा सुकन्याने कॅमेरा शेअर केला आहे. ही अभिनेत्री लवकर आता विवाहबंधनात अडकणार आहे. सुकन्याने तिच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

अभिनेत्री सुकन्या सुर्वेचा नुकताच साखरुपुडा झाला आहे. तिच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव देवांग तन्ना असं आहे.

सुकन्या म्हणते की, “From काय रे? ते केम छो? आम्ही आमच्या भाषा जुळवल्या नाहीत… आम्ही दोघांनी आमचा निर्णय जुळवला.”

सुकन्याने साखरपुड्यात हिरव्या रंगाची छान आणि पारंपरिक दागिने परिधान केले होते.

या जोडप्यावर संपूर्ण मनोरंजन सृष्टीतून शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

देवांग तन्ना हा गुजराती अभिनेता असून त्याने नाटक, जाहिरात क्षेत्रात काम केलं आहे.






