सई ताम्हणकरची "मानवत मर्डर" ही वेबसीरीज सोनी लिव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झालेली आहे. या सीरीजचे चाहत्यांकडून सोशल मीडियावर कौतुक केले जात आहे. शिवाय सई ताम्हणकरच्या भूमिकेचेही कौतुक केले जात आहे.
Sai Tamhankar In Manvat Murder

अभिनेत्री सई ताम्हणकर हिची मराठी आणि बॉलिवूड इंडस्ट्रीतल्या प्रसिद्ध अभिनेत्रींमध्ये गणना केली जाते. सई ताम्हणकर नेहमीच आपल्या फॅशनमुळे, लूकमुळे आणि अभिनयामुळे चर्चेत राहण्याचा प्रयत्न करते.

नुकतीच सई ताम्हणकरची "मानवत मर्डर" ही वेबसीरीज सोनी लिव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झालेली आहे. या सीरीजचे सोशल मीडियावर कौतुक केले जात आहे.

लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता फरान अख्तरने सीरीजमध्ये सईने साकारलेल्या समिंद्री भूमिकेचे कौतुक केले आहे. फरानने इन्स्टा स्टोरी शेअर करत सईच्या "मानवत मर्डर" सीरीजचे कौतुक केले आहे.

"खरंच ही सीरीज खूप एन्जॉय केली, संपूर्ण टीमचं अभिनंदन..." अनेक दिवसांनंतर अभिनेते आशुतोष गोवारीकर प्रमुख भूमिकेत दिसले आहेत, त्यामुळे त्यांचेही फरानने कौतुक केले आहे.

सईसाठी २०२४ हे वर्ष दमदार ठरलं आहे. तिचे एकामागोमाग एक प्रोजेक्ट्स प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. सई वैविध्य पूर्ण प्रोजेक्ट्सवर काम करताना दिसतेय. भाषा, लूक्स, भूमिका आणि अश्या अनेक गोष्टींचा अभ्यास पूर्वक विचार करून सई काम करतेय.

ग्राउंड झीरो, अग्नी, असंभव, डब्बा कार्टेल, गुलकंद अशा अनेक प्रोजेक्ट्सचा ती भाग होणार आहे.






