लग्नसमारंभ किंवा घरातील इतर शुभ कार्याच्या वेळी सर्वच महिला गळ्यात सुंदर सुंदर दागिने परिधान करतात. दागिने परिधान केल्याशिवाय महिलांचा लुक पूर्ण झाल्यासारखा वाटत नाही. गळ्यात अतिशय उठावदार आणि शोभून दिसतील असे सुंदर सुंदर दागिने महिला घालतात. हल्ली टेम्पल ज्वेलरीची मोठी क्रेझ सोशल मीडियासह इतर सर्वच ठिकाणी पाहायला मिळत आहे. टेम्पल दागिने परिधान केल्यानंतर गळा भरगच्च आणि सुंदर दिसतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला टेम्पल दागिन्यांच्या काही सुंदर डिझाइन्स सांगणार आहोत. या डिझाइन्सचे दागिने लग्नसमारंभात नक्की परिधान करा. (फोटो सौजन्य – pinterest)
लग्नसमारंभात परिधान करा ठसठशीत 'टेम्पल ज्वेलरी'
वेगवेगळ्या रंगीत मण्यांचा वापर करूनसुद्धा टेम्पल दागिने तयार केले जातात. त्यामुळे तुम्ही तुमच्या साडीला मॅच होतील असे दागिने बनवून घेऊ शकता.
सर्वच महिलांना सोन्याचे दागिने घालायला खूप आवडतात. त्यामुळे लग्नकार्याच्या दिवसांमध्ये घालण्यासाठी या डिझाइन्सचे सोन्याचे दागिने घालू शकता.
तुमचे सौंदर्य अधिक खुलून दिसण्यासाठी तुम्ही लग्नात या डिझाइन्सचे सुंदर दागिने घालू शकता. यामध्ये छोट्या छोट्या आकाराची देवीची किंवा सरस्वतीची रूप घडवली जातात.
कॉटन किंवा सिल्कची साडी नेसल्यानंतर तुम्ही या डिझाइन्सचा सुंदर नेकलेस घालू शकता. टेम्पल दागिन्यांमध्ये देवीची रूप घडवली जातात.
साडी नेसल्यानंतर अनेक महिला गळ्याभोवती सुंदर चोकर घालतात. चोकर घातल्यामुळे इतर कोणतेही दागिने घालण्याची आवशक्यता भासत नाही.