श्रावण महिन्याला सुरुवात झाल्यानंतर गणपती बाप्पाच्या आगमनाची सगळ्यांचं चाहूल लागते. मुंबईमधील प्रसिद्ध चिंचपोकळी चिंतामणी गणेशोत्सव मंडळाचा आगमन सोहळा मोठ्या आनंद आणि उत्साहात साजरा केला जात आहे. यंदाच्या वर्षी कलागंधा आर्ट्सने गणपती बाप्पाची मूर्ती छत्रपती संभाजी महाराजांच्या रूपात साकारली आहे. चिंतामणीच्या आगमनासाठी दरवर्षी लाखोंच्या संख्येने भक्त एकत्र जमा होत ढोल ताशाच्या गजरात बाप्पाचे आगमन करतात. बाप्पाचे देखणे रूप पाहण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली आहे. चला तर पाहुयात चिंचपोकळीच्या चिंतामणीची पहिली झलक. (फोटो सौजन्य: instagram)
शाही थाटात चिंचपोकळीच्या चिंतामणीचे जलौषात आगमन
चिंचपोकळीचा चिंतामणी हे मुंबईतील सगळ्यात जुन्या मंडळांपैकी एक आहे. या मंडळाची स्थापना होऊन १०५ वर्ष पूर्ण झाली आहे. १९०२ साली चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाची स्थापना करण्यात आली होती.
दरवर्षी चिंतामणीच्या आगमनासाठी लाखोंच्या संख्येने भाविक मुंबईतील चिंचपोकळीमध्ये दाखल होतात. ढोल ताशाच्या गजरात यंदाच्या वर्षी बाप्पाचे मोठ्या जलौषात आगमन झाले आहे.
यंदाच्या वर्षी बाप्पा छत्रपती संभाजी महाराज यांच्या रूपात साकारण्यात आला आहे. यामध्ये बाप्पाचा शाही थाट दिसून येत आहे. आगमनावेळी बाप्पाला लाल रंगाचे धोतर आणि लाल रंगाचा शेला परिधान करण्यात आला आहे.
मुंबईच्या रस्त्यांवर बाप्पाच्या आगमन सोहळ्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. परळच्या गणेश चित्रशाळेतून बाप्पाची मूर्ती चिंचपोकळीकडे जाण्यास मार्गस्त झाली आहे.
चिंचिपोकळीच्या चिंतामणीची पहिली झलक सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.