अन्नपदार्थ, फळे, भाज्या, फळांचा रस किंवा इतर सर्वच पदार्थ जास्त वेळ व्यवस्थित टिकून राहण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवली जातात. फ्रिजमध्ये ठेवलेले पदार्थ जास्त वेळ व्यवस्थित टिकून राहतात, असे सगळ्यांचं वाटते. मात्र असे नसून फ्रिजमध्ये ठेवलेल्या पदार्थांवर लगेच बॅक्टरीया तयार होतात. हे बॅक्टरीया शरीराचे आरोग्य बिघडून टाकण्यास कारणीभूत ठरतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला शिल्लक राहिलेले अन्नपदार्थ फ्रिजमध्ये ठेवताना कोणत्या टिप्स फॉलो कराव्यात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. यामुळे पदार्थ लवकर खराब होत नाही. (फोटो सौजन्य – istock)
शिल्लक राहिलेले पदार्थ फ्रिजमध्ये ठेवण्याआधी फॉलो करा 'या' सोप्या टिप्स
रात्रीच्या वेळी शिल्लक राहिलेले अन्नपदार्थ फ्रिजमध्ये ठेवले जातात. ०-४°C ठेवलेल्या अन्नपदार्थांवर बॅक्टेरियाची वाढ झपाट्याने होत नाही. ज्यामुळे अन्नपदार्थ जास्त वेळ चांगले राहतात.
जेवणातील पदार्थ शिजवल्यानंतर ते पूर्णपणे थंड करूनच नंतरच फ्रिजमध्ये ठेवावा. यामुळे दुसऱ्या दिवशीपर्यंत सुद्धा अन्नपदार्थांची चव कायमच टिकून राहते.
शिजवलेले अन्नपदार्थ दोन तासांच्या आतमध्ये फ्रिजमध्ये ठेवून द्यावे. तापमानात होणाऱ्या बदलांमुळे अन्नपदार्थ लवकर खराब होण्याची जास्त शक्यता असते.
शिल्लक राहिलेले जेवण फ्रिजमध्ये ठेव्याचे असल्यास स्वच्छ आणि हवाबंद डब्यांमध्ये ठेवावे. यामुळे पदार्थाचा वास संपूर्ण फ्रिजमध्ये पसरणार नाही.
फ्रिजमध्ये ठेवलेले अन्नपदार्थ वारंवार गरम करून खाऊ नये. यामुळे पदार्थांमधील पोषण कमी होऊन जाते आणि पदार्थाची चव पूर्णपणे बिघडते.