जगभरात मधुमेहासारख्या गंभीर आजाराने असंख्य रुग्ण त्रस्त आहेत. हा आजार कधीच बरा होत नाही. रक्तात साखरेची पातळी वाढल्यानंतर शरीरात अनेक गंभीर लक्षणे दिसू लागतात. योग्य वेळी लक्ष न दिल्यास रक्तात वाढलेली साखर शरीराच्या इतर अवयवांना हानी पोहचवते. त्यामुळे मधुमेह असलेल्या रुग्णांनी आहारात कमीत कमी साखरेचे आणि गोड पदार्थांचे सेवन करावे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला मधुमेहाच्या रुग्णांसाठी कोणती फळे अमृतासमान ठरतील, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या फळांमध्ये पॉलिफेनॉल अँटीऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजे आढळून येतात. (फोटो सौजन्य – istock)
मधुमेहाच्या रुग्णांसाठी 'ही' फळे ठरतील अमृतासमान

सकाळच्या नाश्त्यात नियमित एक सफरचंद खाल्ल्यास शरीरातील पाण्याची पातळी कायमच संतुलित राहील. याशिवाय सफरचंदमध्ये असलेल्या घटकांमुळे रक्तातील साखरेची पातळी वाढत नाही.

नाश्पतीमध्ये पाण्याचे प्रमाण भरपूर असते. तसेच फायबर आणि जीवनस्तवे आढळून येतात. शरीरात इन्सुलिन संवेदनशीलता वाढवण्यासाठी नाश्पतीचे सेवन करावे.

एवोकॅडो खायला कोणालाच आवडत नाही. पण यामध्ये असलेल्या निरोगी चरबी आणि पोटॅशियममुळे शरीराला भरपूर फायदे होतात. शरीरात वाढलेली कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी एवोकॅडो खावे.

नियमित एक डाळिंब खाल्ल्यास आजारांपासून तुम्ही कायमच दूर राहाल. कारण यामध्ये असलेले गुणकारी घटक आढळून येतात. सकाळी उठल्यानंतर डाळिंबाचा रस पिण्याऐवजी डाळिंबाच्या दाण्यांचे सेवन करावे.

थंडीच्या दिवसांमध्ये बाजारात संत्री मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात. आंबट गोड चवीची संत्री शरीरात इन्सुलिनची पातळी कायमच संतुलित ठेवतात.






