शरीराला गंभीर आजारांची लागण झाल्यानंतर कायमच डॉक्टरांच्या सल्ल्याने गोळ्या औषधांचे सेवन केले जाते. पण त्याऐवजी आयुर्वेदिक पदार्थांचे सेवन करून पाहावे. मधुमेह झाल्यानंतर शेवग्याच्या पानांचे सेवन केल्यास रक्तात वाढलेली साखर नियंत्रणात राहतात. शेवग्याच्या पानांमध्ये असलेले गुणकारी घटक शरीर आतून स्वच्छ ठेवतात. मागील अनेक शतकांपासून शेवग्याच्या पानांची भाजी किंवा काढा बनवून प्यायला जात आहे. आयुर्वेदिक औषधांच्या यादीमध्ये शेवग्याच्या पानांचे नाव प्रथम स्थानी आहे. चला तर जाणून घेऊया शेवग्याच्या पानांचे शरीराला भरमसाट फायदे. (फोटो सौजन्य – istock)
मधुमेह नियंत्रणात ठेवण्यापासून ते रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी प्रभावी ठरतील शेवग्याची पाने

शेवग्याच्या पानांमध्ये विटामिन ए, विटामिन सी, कॅल्शियम, पोटॅशियम आणि लोह इत्यादी अनेक घटक मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. शरीरात निर्माण झालेली पोषक घटकांची कमतरता भरून काढण्यासाठी शेवग्याच्या पानांचे सेवन करावे.

थंडीच्या दिवसांमध्ये शरीराची कमकुवत झालेली रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी अँटीऑक्सिडंट्स युक्त शेवग्याच्या पानांचे सेवन करावे. या पानांच्या सेवनामुळे सर्दी खोकला कमी होतो.

रक्तात वाढलेली साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी शेवग्याच्या पानांचे किंवा रसाचे सेवन करावे. यामुळे मधुमेह नियंत्रणात राहतो. इन्सुलिन संवेदनशीलता सुधारून मधुमेहाचे व्यवस्थापन करण्यास मदत होते.

शेवग्याच्या पानांमध्ये असलेल्या फायबरमुळे पचनाच्या समस्या अजिबात उद्भवत नाही. गॅस, ऍसिडिटी आणि बद्धकोष्ठतेपासून आराम मिळवण्यासाठी ही पाने प्रभावी ठरतील.

सांधेदुखी, हाडांमधील वेदना इत्यादी सर्वच समस्या कमी करण्यासाठी शेवग्याची पाने प्रभावी ठरतात. यामध्ये असलेले दाहक विरोधी गुणधर्म सांध्यांमधील जळजळ कमी करतात.






