आंबटगोड चवीची किवी खायला सगळ्यांचं खूप जास्त आवडते. दैनंदिन आहारात वेगवेगळ्या फळांचे सेवन करावे. फळांच्या सेवनामुळे शरीराला आवश्यक प्रमाणात पोषक घटक मिळतात. किवीमध्ये विटामिन सी, फायबर, पोटॅशियम आणि अँटिऑक्सिडंट्स इत्यादी अनेक घटक मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. किवीच्या सेवनामुळे पचनक्रिया सुधारते, बद्धकोष्ठतेच्या त्रासापासून सुटका मिळते, हृदयाचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. त्यामुळे आहारात किवीचा समावेश करावा. चला तर जाणून घेऊया किवीचे सेवन करण्याची योग्य वेळ आणि फायदे. (फोटो सौजन्य – istock)
हृदयापासून बद्धकोष्ठतेपर्यंत...! नियमित एक किवीचे सेवन केल्यास शरीराला होतील भरमसाट फायदे, जाणून घ्या खाण्याची वेळ

किवीमध्ये भरपूर प्रमाणात विटामिन सी असते. ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती सुधारते आणि त्वचेच्या समस्या कमी होण्यास मदत होते. शरीराची रोगांशी लढण्याची क्षमता मजबूत करण्यासाठी किवीचे सेवन करावे.

किवीमधील पोटॅशियम, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात. याशिवाय खराब कोलेस्ट्रॉल नष्ट करण्यासाठी किवीचा आहारात समावेश करावा.

त्वचेवरील तेज वाढवण्यासाठी स्किन केअरचा वापर न करता आहारात विटामिन सी युक्त किवीचे सेवन करावे. यामुळे काळे डाग आणि सुरकुत्या कमी होतात.

किवीमध्ये ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन नावाचे घटक, डोळ्यांचे आरोग्य चांगले ठेवण्यास मदत करतात. कमी कॅलरीज आणि फायबर युक्त किवी खाल्ल्यामुळे पोट भरलेले राहते.

किवीचे सेवन तु्म्ही सकाळच्या नाश्त्यात किंवा जेवणानंतर सुद्धा करु शकता. उपाशी पोटी किवी खाऊ नये.






