सर्वच ऋतूंमध्ये लिंबू पाण्याचे सेवन केले जाते. लिंबू पाणी शरीराला डिटॉक्स करण्याचे काम करते. लिंबामध्ये विटामिन सी मोठ्या प्रमाणावर आढळून येते. ज्याचा फायदा त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठी होतो. रोजच्या आहारात लिंबू पाण्याचे सेवन केल्यास शरीर निरोगी राहण्यास मदत होईल. वाढलेले वजन कमी करण्यापासून ते त्वचेच्या आरोग्य सुधारण्यापर्यंत अनेक गोष्टींसाठी लिंबू पाणी प्रभावी आहे. शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी रोजच्या आहारात तुम्ही लिंबू पाण्याचे सेवन करू शकता. आज आम्ही तुम्हाला लिंबू पाणी प्यायल्यामुळे आरोग्याला नेमके काय फायदे होतात, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
लिंबू पाणी पिण्याचे आरोग्यदायी फायदे

सर्वच ऋतूंमध्ये मानवी शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमी होते. सतत आजारी पडत राहिल्यामुळे हळूहळू आजार मोठे होऊ लागतात. त्यामुळे बिघडलेली रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी आहारात लिंबू पाण्याचे सेवन करावे.

विटामिन सी युक्त लिंबू पाणी त्वचेसाठी अतिशय गुणकारी आहे. त्वचेवर आलेले पिंपल्स, डाग, पिगमेंटेशन कमी करण्यासाठी लिंबाचा रस मदत करतो. तसेच शरीरातील हानिकारक पेशींपासून त्वचेचे होणारे नुकसान कमी करण्यासाठी लिंबू पाणी फायदेशीर आहे.

वाढलेले वजन कमी करण्यासाठी लिंबू पाणी अतिशय प्रभावी आहे. सकाळी उठल्यानंतर कोमट पाण्यात लिंबू पिळून उपाशी पोटी लिंबू पाणी प्यायल्यास पोटावरील चरबी झपाट्याने कमी होण्यास मदत होईल.

सतत बाहेरचे तेलकट आणि तिखट पदार्थ खाऊन बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यासाठी रोजच्या आहारात लिंबू पाण्याचे सेवन करावे. यामुळे शरीरात पाचक एंझाइमचे उत्पादन वाढते आणि शरीर निरोगी राहण्यास मदत होते. लिंबू पाणी डिटॉक्स वॉटर म्हणून सुद्धा प्यायले जाते.

मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी लिंबू पाण्याचे सेवन करावे. शरीरातील सेरोटोनिनची पातळी वाढून मन शांत आणि आनंदी ठेवण्यासाठी लिंबू पाणी मदत करते.






