संग्रहित फोटो
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी अनुपमा शिंदे, त्यांचे पती संजय, विवाहित मुलगा, सून व सासू सुमन हे एकत्र राहायला आहेत. अनुपमा यांचे पती सेवानिवृत्त आहेत. विवाहित मुलगा नोकरी करतो. अनुपमांचा किरकोळ कारणावरुन सासूसोबत वाद व्हायचा. मंगळवारी (१२ मे) अनुपमा आणि सुमन घरात होत्या. दुपारी दीडच्या सुमारास त्यांच्यात वाद झाला. वादातून अनुपमा यांनी सुमन यांच्यावर स्वयंपाकघरातील सुरीने सासू सुमन यांच्यावर वार केले. त्यानंतर त्यांनी स्वत:ला कोडून घेतले. अनुपमा यांनी कोंडून घेतल्याची माहिती कुटुंबीयांना मिळाली. नंतर त्यांनी पोलिस नियंत्रण कक्षाला याबाबतची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दरवाजा उघडला.
पोलिसांनी घराची पाहणी केली. शयनगृहात सुमन रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या. पोलिसांनी चौकशी केली. तेव्हा कौटुंबिक वादातून सुनेने सासूचा खून केल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सुमन यांना ससून रुग्णालयात दाखल केले. अनुपमा यांची चौकशी करण्यात आली. तेव्हा त्यांनी खून केल्याची कबुली दिली. या प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे. सहायक निरीक्षक मिथून परदेशी तपास करत आहेत.
धारधार हत्याराने सपासप वार करून तरुणाचा खून
आंबेगाव पठार परिसरात अनैतिक संबंधातून एका तरुणाचा डोक्यात लाकडी पाट तसेच धारधार हत्याराने सपासप वार करून खून करण्यात आल्याची घटना रविवारी रात्री घडली आहे. दरम्यान, दोघांनी या तरुणाचा खून केला असून, दोघेही पसार आहेत. त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती आंबेगाव पोलिसांनी दिली. दिपक क्षीरसागर वय (३८, रा. आंबेगाव) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी आंबेगाव पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत दिपक याच्या बहिणीने पोलिसांकडे तक्रार दिली आहे.






