सर्वच महिलांना महिन्याचे ४ किंवा ५ दिवस मासिक पाळी येते. मासिक पाळीच्या दिवसांमध्ये महिलांना असंख्य समस्यांना सामोरे जावे लागते. या दिवसांमध्ये सतत पोटात दुखणे, उलट्या, मळमळ, सतत मूड स्विंग होणे, कंबर दुखणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. मासिक पाळीमध्ये होणाऱ्या पोट दुखीपासून आराम मिळवण्यासाठी महिला मेडिकलमधील गोळ्या औषधांचे सेवन करतात. मात्र सतत गोळ्यांचे सेवन करणे आरोग्यासाठी घातक आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला मासिक पाळीच्या वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी कोणत्या पदार्थांचे आहारात सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. मासिक पाळी आल्यानंतर शरीरातून जास्त रक्त बाहेर पडते, ज्यामुळे तुम्हाला थकवा अशक्तपणा जाणवू लागतो. या पदार्थांचे सेवन केल्यास शरीरात कायमच ऊर्जा टिकून राहील. (फोटो सौजन्य – istock)
मासिक पाळीत जास्त रक्तस्त्राव होतो? आहारात 'या' पदार्थांचे सेवन करून कायमचा मिळवा आराम
मासिक पाळी आल्यानंतर शरीरात लोहाची कमतरता जाणवू लागते. यामुळे शरीरात सतत अशक्तपणा, थकवा जाणवतो. अशावेळी आहारात हिरव्या पालेभाज्यांचे सेवन करावे. कोबी, पालक, मेथी इत्यादी भाज्यांचे सेवन केल्यास शरीरात निर्माण झालेली लोहाची कमतरता भरून निघेल.
महिलांच्या आरोग्यासाठी खजूर अतिशय गुणकारी आहे. नियमित एक किंवा दोन खजूर खाल्यास मासिक पाळीच्या दिवसांमध्ये वेदना होणार नाही. खजूरमध्ये मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते, ज्यामुळे पोटात पेटके येत नाहीत.
केळीमध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियम मोठ्या प्रमाणावर आढळून येते. त्यामुळे नियमित एक किंवा दोन केळी खावीत. केळी खाल्यामुळे महिलांच्या शरीरात वाढलेली डिहायड्रेशनची समस्या कमी होते आणि शरीर कायम हायड्रेट राहते.
मासिक पाळीच्या दिवसात शरीरात वाढलेला ताण आणि मूड स्विंगस कमी करण्यासाठी डार्क चॉकलेटी खावे. डार्क चॉकलेट खायला सगळ्यांचं खूप जास्त आवडत.
ड्रायफ्रूट खायला सगळ्यांचं खूप जास्त आवडत. त्यामुळे नियमित तुम्ही काजू, बदाम, काळे मनुके, अक्रोड किंवा अंजीर खाऊ शकता. हे पदार्थ शरीरात ऊर्जा कायम टिकवून ठेवतात.