राज्यासह संपूर्ण देशभरात भयंकर उष्णता वाढली आहे. वाढत्या उष्णतेचा आरोग्यावर लगेच परिणाम दिसून येतो. कडक उन्हात कुठेही बाहेर गेल्यानंतर अंगातून घामाच्या धारा वाहू लागतात. घामावाटे शरीरातील पाणी आणि आवश्यक क्षार बाहेर पडून गेल्यामुळे आरोग्य बिघडण्याची जास्त शक्यता असते. यामुळे शरीरात थकवा, अशक्तपणा वाढून शरीराचा रक्तदाब कमी होतो, ज्याच्या परिणामामुळे कोणत्याही क्षणी मृत्यू होण्याची जास्त शक्यता असते. चला तर जाणून घेऊया मानवी शरीर किती उष्णता सहन करू शकते? याबद्दल सविस्तर माहिती. (फोटो सौजन्य – istock)
देशभरात वाढलेल्या तापमानाचा मानवी शरीरावर कसा परिणाम होतो? मानवी शरीर किती उष्णता सहन करू शकते, जाणून घ्या सविस्तर

मानवी शरीराचे साधारण तापमान 37°C एवढे असते. तापमान वाढल्यानंतर शरीर स्वतःला थंड ठेवण्यासाठी घाम तयार करतो. पण बाहेर वाढलेल्या तापमानामुळे शरीरात अनेक बदल दिसू लागतात.

40°C पेक्षा जास्त तापमान वाढल्यानंतर शरीरावर लगेच परिणाम दिसू लागतात. अशावेळी शरीर थंड ठेवणे फार आवश्यक आहे. जास्त वेळ कडक उन्हात बाहेर फिरून आल्यानंतर चक्कर येणे, अशक्तपणा, थकवा तर शरीरात जळजळ होते.

45°C तापमानात जास्त वेळ राहिल्यास मानवी शरीराला धोका निर्माण होऊ शकतो. यामुळे हिट स्ट्रोक किंवा रक्तदाब कमी झाल्यामुळे कोणत्याही क्षणी मृत्यू होऊ शकतो.

तापमानात वाढ झाल्यानंतर बऱ्याचदा शरीरात वेगवेगळी लक्षणे दिसू लागतात. चक्कर येणे, तीव्र डोकेदुखी, उलटी, अशक्तपणा, खूप घाम येणे किंवा घाम न येणे यांसारखी लक्षणे दिसू लागल्यास तात्काळ डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावेत.

मानवी शरीर 37 ते 40 डिग्री सेल्सिअस पर्यंत उष्णता सहन करू शकते. त्यापेक्षा जास्त उष्णता वाढल्यास शरीरसंबंधित आजारांची लागण होऊन आरोग्य बिघडू शकते.






