पूर्वीच्या काळापासून ते आत्तापर्यंत रोजच्या जेवणात नियमित तुपाचा वापर केला जातो. तूप खाल्ल्याने रूप येते, असे कायमच म्हंटले जाते. यामध्ये विटामिन ए, डी, ई आणि ओमेगा-३ फॅटी ॲसिड इत्यादी अनेक आवश्यक गुणकारी घटक मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. तूप खाल्ल्यामुळे शरीराची पचनक्रिया सुधारते, रोगप्रतिकारशक्ती मजबूत होण्यास मदत होते. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर नियमित एक ग्लास कोमट पाण्यात एक चमचा तूप मिक्स करून प्यावे. १० ते १५ दिवस नियमित तुपाचे पाणी प्यायल्यास शरीरसंबंधित गंभीर आजारांपासून सुटका मिळेल. जाणून घ्या तूप खाण्याचे फायदे.(फोटो सौजन्य – istock)
एक ग्लास कोमट पाण्यात नियमित तूप मिक्स करून प्यायल्यास शरीराला होतील फायदे, १० दिवसात दिसेल फरक

जान्हवी कपूर, आलिया भट, क्रिती सेनन यांच्यासारख्या अभिनेत्री दिवसाची सुरुवात एक ग्लासभर पाण्यात तुपाचे सेवन करून करतात. यामध्ये असलेल्या ब्युटॅरीक ॲसिडमुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.

सकाळी उठल्यानंतर पोट व्यवस्थित स्वच्छ होत नसेल तर चमचाभर तूप खावे. यामुळे जुनाट बद्धकोष्ठता, अपचन आणि ऍसिडिटीच्या त्रासापासून कायमची सुटका मिळेल.

महिलांसह सर्वच पुरुषांना आपली त्वचा कायमच चमकदार आणि सुंदर देखणी हवी असते. चेहऱ्यावर आलेले पिंपल्स आणि सुरकुत्या घालवण्यासाठी सकाळी उठल्यानंतर चमचाभर तूप खावे.

तूप खाल्ल्यामुळे हेल्दी फॅट्स क्रेव्हिंग नियंत्रित राहण्यास मदत होते. वजन वाढल्यानंतर ते कमी करण्यासाठी कोणतेही सप्लिमेंट्स किंवा डाएट घेण्याऐवजी एक ग्लासभर पाण्यात तूप मिक्स करून प्यावे.

कोलेस्ट्रॉल किंवा हृद्यासंबंधित गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या लोकांनी तूप खाण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. अन्यथा रक्तात पुन्हा एकदा कोलेस्ट्रॉलची पातळी वाढू शकते.






