काय नेमकं प्रकरण?
पीडित 17 वर्षे मुलीचे यश जगदीश कांबळे या तरुणांसोबत प्रेमसंबंध होते. तिचं वय कमी आहे हे माहिती असतानाही देखील आरोपी यशने तिला लग्नाचा आमिष दाखवून मार्च 2025 मध्ये तिला घरातून पळवून नेलं. त्यानंतर त्याने सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील नगराळे इथं त्या मुलीला नेऊन तिचं लैंगिक शोषण केलं. या सर्व प्रकरणात यश कांबळेचे नातेवाईक आणि त्याच्या काही मित्रांनी त्यांना आश्रय दिला होता.
पोटात दुखु लागल्याने प्रकरण उघड
एके दिवशी पीडित अल्पवयीन मुलीच्या पोटात दुखू लागल्याने तिला आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आला. त्यावेळी ती गरोदर असल्याचे समोर आले. याप्रकरणी ग्रामपंचायत अधिकारी वासंती कुलकर्णी यांनी पोलिसात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पेटवडगाव पोलिसांनी संशयित आरोपी यश जगदीश कांबळे यांच्यासह संदीप जाधव दिपाली सुहास जाधव रेखा आप्पांसो जाधव यांच्यावर गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास पोलीस करत असून बालविवाह आणि लैंगिक शोषणाच्या या गंभीर प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडालेली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
जिथे कुटुंब गमावलं, तिथेच संपवलं आयुष्य; पुण्यातील विराट गौतम यांची आत्महत्या
कोल्हापूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ज्या घाटात पत्नी आणि मुलगा-मुलगी जीव गमावला त्याच ठिकाणी एका व्यक्तीने एका व्यक्तीने आयुष्य संपवल्याचे समोर आले आहे. आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव विराट गौतम असे आहे.
Ans: या प्रकरणातील मुख्य आरोपी यश जगदीश कांबळे आहे.
Ans: पीडित मुलगी गरोदर राहिल्यानंतर आरोग्य तपासणीत हा प्रकार समोर आला.
Ans: मुख्य आरोपीसह एकूण चौघांविरोधात पेठवडगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.






