लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं लोणचं खायला खूप आवडत. जेवणाच्या ताटात जर भाजी नसेल तर लोणचं खाल्ले जाते. आजवर तुम्ही आंब्याचं लोणचं, लिंबाचं लोणचं, मिरचीचे लोणचं इत्यादी अनेक प्रकारचे लोणचं खाल्ले असतील. चवीला आंबटगोड असलेले लोणचं जेवणात असेल तर चार घास जेवण जास्त जात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला अशा काही लोणच्यांबद्दल सांगणार आहोत, जे तुम्ही सकाळ, दुपार किंवा रात्रीच्या जेवणात खाऊ शकता. याशिवाय लोणचं पराठा, भाकरी, चपाती आणि थालीपीठसोबत खाल्ले जाते. (फोटो सौजन्य – istock)
जेवणाच्या ताटात 'या' आंबट गोड लोणच्यांना द्या जागा
लहान मुलांसह मोठ्यांना बीट खायला आवडत नाही. अशावेळी तुम्ही बीटचे लोणचं घरी बनवू शकता. हे लोणचं चवीला थोडेसे गोड लागते पण आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. लोणचं बनवताना व्हिनेगर आणि इतर मसाल्यांचा वापर केला जातो.
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये घरात वाळवणाचे पदार्थ बनवले जातात. त्यात प्रामुख्याने कैरीचे लोणचं बनवले जाते. चवीला आंबटगोड लोणचं खायला सगळ्यांचं खूप जास्त आवडत. कैरीच्या लोणच्यांची चव अतिशय सुंदर लागते.
कांद्याचा वापर जेवणातील पदार्थ बनवताना केला जातो, तसाच वापर लोणचं बनवण्यासाठी सुद्धा केला जातो. कांद्याचं लोणचं तुम्ही कधी ऐकले नसेल पण पांढऱ्या कांद्याचा वापर करून लोणचं बनवलं जात.
गुळाचा वापर करून बनवलेले गोड कैरीचे लोणचं लहान मुलांना खूप जास्त आवडते. या लोणच्यासोबत भाकरी अतिशय सुंदर लागते. गूळ आणि कच्ची कैरी शिजवून त्यात केलेले लोणचं एक किंवा दीड महिना व्यवस्थित टिकते.
भारतासह जगभरात सगळीकडे लिंबाचे लोणचं फेमस आहे. आजारी पडल्यानंतर किंवा तोंडाची चव खराब झाल्यानंतर जेवणाच्या ताटात लिंबाचे लोणचं दिले जाते.