भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये पाच सामन्याची T२० मालिका सुरु आहे. यामध्ये सातत्याने सामन्यांमध्ये कामगिरी करणारा गोलंदाज म्हणजेच वरुण चक्रवर्ती. वरूणने संघासाठी सातत्याने कमालीची कामगिरी केली आहे. पण त्याला चॅम्पियन ट्रॉफी २०२५ मधून वगळण्यात आले आहे त्यामुळे अनेकजण टीम इंडियाच्या निवडसमितीवर अनेक प्रश्न उपस्थित करत आहे. आता वरुण चक्रवर्ती आणखी एक रेकॉर्ड नावावर करण्याच्या सीमारेषेवर आहे यासंदर्भात वाचा.
वरुण चक्रवर्ती आणखी एक रेकॉर्ड नावावर करण्याच्या सीमारेषेवर. फोटो सौजन्य - BCCI सोशल मीडिया
टीम इंडियाचा उगवता स्टार स्पिनर वरुण चक्रवर्तीला इतिहास रचण्याची संधी आहे. इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या टी-२० मालिकेत त्याने ४ विकेट घेतल्यास तो विश्वविक्रम करू शकतो.
वरुण चक्रवर्तीने इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या टी-२० मालिकेत आतापर्यंत १२ बळी घेतले आहेत. मुंबईत होणाऱ्या शेवटच्या T२० मध्ये त्याने आणखी ४ विकेट घेतल्यास तो विश्वविक्रम करेल.
टी-२० द्विपक्षीय मालिकेत सर्वाधिक विकेट्स घेण्याचा हा विश्वविक्रम आहे. सध्या हा विक्रम वेस्ट इंडिजच्या जेसन होल्डरच्या नावावर आहे, पण वरुण चक्रवर्तीला या विक्रम त्याच्या नावावर करण्याची सुवर्णसंधी आहे.
द्विपक्षीय T२० मालिकेत सर्वाधिक १५ विकेट्स घेण्याचा विश्वविक्रम वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू जेसन होल्डरच्या नावावर आहे. त्याने २०२२ मध्ये इंग्लंडविरुद्ध हा पराक्रम केला होता.
वरुण चक्रवर्ती द्विपक्षीय मालिकेत १२ विकेट्ससह भारतासाठी सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आहे. त्याने हा पराक्रम दुसऱ्यांदा केला आहे. याआधी त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतही तेवढ्याच विकेट घेतल्या होत्या.