भारतातील सर्वात महाग चित्रपट म्हणून नोंद झालेल्या या चित्रपटाला बाॅक्स ऑफिसवर तब्बल 80 टक्के नुकसान सहन करावं लागलं. हा चित्रपट 90 च्या दशकातील सर्वात मोठा फ्लॉप चित्रपट म्हणून ओळखला जातो. या चित्रपटात चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांनी काम केले आहे मात्र तरीही हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण करु शकला नाही.
90 च्या दशकातील सर्वात मोठा फ्लॉप चित्रपट! दिग्दर्शकाचं करियर धुळीत मिळालं तर संपूर्ण चित्रपटसृष्टी कर्जात बुडाली
शोले चित्रपटानंतर कमल अमरोही यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट होता. या चित्रपटासाठी अवघी 7 वर्षे लागली. मात्र याचा शेवट इतका वाईट होता की,यात संपूर्ण चित्रपटसृष्टी कर्जात बुडाली
भारतातील एकमेव महिला शासक रझिया सुलतानच्या आयुष्यावर आधारीत हा बायोपिक 1983 मध्ये रिलाज झाला. या चित्रपटाचे बजेट 10 कोटी होते, त्यावेळचा हा सर्वात महागडा चित्रपट होता
हेमा मालिनी, धर्मेंद्र, परवीन बाबी, सोहराब मोदी आणि अजित अशी मोठी स्टारकास्ट चित्रपटाला लाभली होती. मात्र तरीही प्रेक्षकांनी या चित्रपटाकडे पाठ फिरवली आणि हा चित्रपट अपयशी ठरला
दिग्दर्शकाने या चित्रपटासाठी इंडस्ट्रीमधून अनेक कर्ज घेतली होती आणि चित्रपट बनवण्यासाठी अनेक क्रू मेंबर्सचे वेतन देखील रोखले होते. रिलीजनंतर पैसे देऊ असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र चित्रपट फ्लाॅप झाला आणि याला 80 टक्के नुकसान सहन करावे लागले
10 कोटींच्या या चित्रपटाने बाॅक्स ऑफिसवर फक्त 2 कोटी कमावले. परिणामी बॉलिवूडमधील अनेक उद्योगांना रोख रकमेची कमतरता भासू लागली चित्रपटात समलिंगी चुंबन दाखवण्यात आले होते, जे प्रेक्षकांना आवडले नाही
तसेच चित्रपटातील उर्दु भाषा लोकांना फार गुंतागुंतीची वाटली, ज्यामुळे चित्रपटाला नकारात्मक प्रतिक्रिया मिळत गेल्या. IMDb नुसार, जवळजवळ हिंदी चित्रपट उद्योग यामुळे कर्जात बुडाला. 1993 मध्ये दिग्दर्शक कमल अमरोही यांच्या निधनामुळे 'रझिया सुलतान' हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला