केस गळणे किंवा केसात कोंडा होणे ही अतिशय सामान्य समस्या आहे. सतत केस गळण्यास सुरुवात झाल्यानंतर महिला बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या हेअर सीरम आणि शाम्पूचा वापर करतात. पण यामध्ये असलेल्या केमिकलयुक्त घटकांमुळे केसांच्या समस्या कमी होण्याऐवजी खूप जास्त वाढतात. त्यामुळे केसांच्या वाढलेल्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी रोझमेरीचा वापर करावा. रोझमेरीच्या वापरामुळे केसांच्या सर्वच समस्या दूर होतात. याशिवाय रोझमेरीचा स्प्रे केसांवर मारल्यास केसांमध्ये वाढलेला कोंडा नष्ट होईल आणि केसांच्या समस्यांपासून कायमची सुटका मिळेल. जाणून घ्या रोझमेरीचे फायदे. (फोटो सौजन्य – istock)
महागड्या हेअर सीरम व शाम्पूचा वापर करण्याऐवजी Rosemary चा वापर केल्यास केसांचे गळणे होईल कमी

रोझमेरी ही एक औषधी वनस्पती आहे. ही वनस्पती केस गळतीसाठी जीवन रक्षक मानली जाते. टोपात पाणी गरम करून त्यात रोझमेरी टाकून उकळवून घ्या. त्यानंतर तयार केलेले पाणी गाळून स्प्रे बॉटलमध्ये भरून नियमित केसांवर स्प्रे करा.

तुमचे केस जर कोरडे आणि निस्तेज झाले असतील तर रोझमेरी हेअर मास्क केसांवर लावल्यास केस सुंदर होतील. रोझमेरीच्या वापरामुळे केसांच्या समस्या कमी होऊन केस सुंदर आणि मजबूत होतात.

रोझमेरी तेल केसांच्या मुळांना पोषण देते आणि केस मजबूत करण्यास मदत करते. रोजच्या वापरातील कोणत्याही तेलात रोझमेरी तेल मिक्स करून लावावे. त्यानंतर हलकासा मसाज करून केस दुसऱ्या दिवशी पाण्याने स्वच्छ धुवून घ्या.

केसांची नैसर्गिक चमक कायम टिकवून ठेवण्यासाठी रोझमेरी अतिशय उपयुक्त ठरेल. थंडीच्या दिवसांमध्ये केस खूप जास्त कोरडे आणि निस्तेज होतात. अशावेळी केस मजबूत करण्यासाठी रोझमेरी स्प्रेचा वापर करावा.

बऱ्याचदा कामाच्या धावपळीमध्ये स्प्रे बनवण्यासाठी जास्तीचा वेळ मिळत नाही. अशावेळी तुम्ही शाम्पूमध्ये रोझमेरी तेलाचे एक दोन थेंब टाकून केस स्वच्छ धुतल्यास सकारात्मक फरक दिसून येईल.






