यंदा बाजारात मोठ्या प्रमाणावर जांभूळ उपलब्ध झाले होते. औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेली जांभळं केवळ चवीसाठीच नाहीतर शरीरासाठी सुद्धा खूप जास्त फायदेशीर आहेत. दैनंदिन आहारात डॉक्टर वेगवेगळ्या फळांचे सेवन करण्याचा सल्ला देतात. त्यामुळे आहारात जांभूळ सुद्धा खावेत. जांभळासोबतच त्यातील बिया सुद्धा शरीरासाठी खूप जास्त प्रभावी ठरतात. रक्तात वाढलेले साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासोबतच शरीराच्या इतर अवयवांना सुद्धा फायदे होतात. चला तर जाणून घेऊया जांभूळ बियांच्या पावडरचे सेवन केल्यास शरीराला होणारे फायदे. (फोटो सौजन्य – istock)
जांभूळ बियांची पावडर शरीरासाठी ठरेल वरदान! मधुमेह नियंत्रणात राहण्यासोबतच आतड्यांचे आरोग्य सुद्धा राहील सक्रिय

जांभळाच्या बियांची पावडर भाकरी किंवा चपातीच्या पिठात मिक्स करून खाऊ शकता. यामुळे रक्तात वाढलेली साखर नियंत्रणात राहण्यासोबतच शरीराला इतर सुद्धा फायदे होतील.

जांभळाच्या बियांमध्ये जांबोलिन नावाचा घटक आढळून येतो, ज्यामुळे रक्तात वाढलेली साखर नियंत्रणात राहते. इन्सुलिन सेंसिटीव्हीटी वाढवण्यासाठी जांभूळ बियांची पावडर फायदेशीर आहे.

आतड्यांचे बिघडलेले आरोग्य चांगले ठेवण्यासाठी जांभूळ बियांच्या पावडरचा आहारात समावेश करावा. यामध्ये असलेले पचनसंबंधित घटक पचनक्रिया निरोगी ठेवतात.

फ्लेव्होनॉइड्स आणि पोटॅशियमने समृद्ध असलेल्या जांभूळ बिया उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवतात आणि हृदयाला कोणतीही हानी पोहचू देत नाहीत.

एक ग्लासभर कोमट पाण्यात जांभूळ बियांची पावडर मिक्स करून प्यावी. यामुळे रक्तात वाढलेले साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहण्यासोबतच शरीराला सुद्धा फायदे होतील.






