फोटो सौजन्य- सोशल मीडिया
महाराष्ट्रातील खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या अटी) नियमावली १९८१ (एमईपीएस) अंतर्गत मनीषा मांढरे यांची चौकशी केली जाईल आणि त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, अशी माहिती सोसायटीचे कार्यवाह प्रा.श्यामकांत देशमुख आणि प्राचार्य डॉ. निवेदिता एकबोटे यांनी दिली आहे.
मनीषा मांढारे या नीट यूजी प्रक्रियेत सहभागी होत्या. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने यांना तज्ञ म्हणून नेमले होते. त्यांना वनस्पतीशास्त्र आणि प्राणिशास्त्र विषयांच्या प्रश्नपत्रिकांची माहिती होती. त्यांनी एप्रिल २०२६ मध्ये आरोपी वाघमारे यांच्या माध्यमातून नीट्च्या उमेद्वारांना त्यांच्या पुण्यातील घरात गोळा करून शिकवणी वर्ग घेतला होता. या वेळी संभाव्य प्रश्न विद्यार्थ्यांना वहीत लिहून घेण्यास सांगितले होते. त्यापैंकी बहुतांश प्रश्न हे तीन मे रोजी झालेल्या नीट परीक्षेतील प्रश्नाशी तंतोतंत जुळत होते.
केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) शनिवारी नीट पेपरफुटीप्रकरणी जीवशास्त्राच्या पुण्यातील प्राध्यापिका मनीषा मांढारे यांना अटक केली होती. मनीषा मांढारे ‘नीट यूजी’च्या प्रश्नपत्रिका निर्मिती समितीच्या सदस्य होत्या. सूत्रधार प्रा. पी.व्ही. कुलकर्णी आणि इतर आरोपींच्या चौकशीच्या आधारे ही अटक करण्यात आली आहे.






