लाबुबू डॉल सध्या जगभरात प्रसिद्ध झाली असून या बाहुलीने जगभरातील लोकांना वेड लावलं आहे. भयानक चेहऱ्याच्या या बाहुलीची क्रेझ दिवसेंदिवस वाढत चालली असून यासंबंधित अनेक नवीन खुलासे समोर येत आहेत. त्यातच आता राक्षसी चेहऱ्याच्या या बाहुलीचे खरोखरच्या राक्षसाची काही संबंध असून त्यात नक्की किती सत्यता आहे ते आज आपण जाणून घेणार आहोत.
लाबुबू डॉल की राक्षसाचं रूप? वाईट शक्तींमुळे होतंय नुकसान... काय आहे या बाहुलीचं सत्य
सध्या सोशल मीडियावर ‘लाबुबू डॉल’ नावाची एक विचित्र बाहुली खूप चर्चेत आहे, जिला पाहून अनेक युजर्स हैराण व घाबरलेले आहेत.
काही लोकांचा असा दावा आहे की ही बाहुली शैतानी आहे आणि ती एखाद्या प्राचीन राक्षसाशी संबंधित आहे
खरंतर लाबुबू ही डॉल २०१५ मध्ये कलाकार कासिंगलुंगने तयार केली होती. ही बाहुली 'द मॉन्स्टर्स' नावाच्या कथेचा भाग आहे. २०१९ मध्ये, चीनच्या प्रसिद्ध कंपनी पॉप मार्टने ती बाजारात आणली आणि तेव्हापासून ती जगभरात खूप लोकप्रिय झाली आहे.
लाबुबूचा संबंध प्राचीन मेसोपोटेमियन राक्षस पाजुजुसोबत जोडण्याचा प्रयत्न केला गेला आहे. त्याच्या नावावरूनच या बाहुलीला लाबुबू नाव देण्यात आल्याचाही दावा करण्यात आला आहे
पाजुजु हा एक भयानक राक्षस आहे ज्याचा उपयोग सर्व सृष्टी उद्धवस्त करण्यासाठी किंवा सर्वनाशासाठी केला जातो. अशात लाबुबू डॉल खरेदी केल्यास आपण संकटात पडू शकता असा दावा आता फार चर्चेत आहे
पण मात्र स्नोप्स आणि ब्रिटानिका यांसारख्या विश्वासार्ह वेबसाइट्सने या सगळ्या दाव्यांना खोटं ठरवून ही एक अफवा असल्याचं स्पष्ट केलं आहे