फोटो सौजन्य - BCCI सोशल मिडिया
भारताचा संघ ९ संप्टेबरपासून सुरु होणाऱ्या आशिया कपसाठी तयारी करत आहे. टीम इंडियाचा हा युवा संघ सुर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली खेळताना दिसणार आहे. भारताच्या संघाकडु क्रिकेट चाहत्यांना मोठ्या अपेक्षा आहे, बीसीसीआयने भारतीय संघाची आशिया कपसाठी घोषणा केली होती. भारताचा कसोटी कर्णधार शुभमन गिल आणि एकदिवसीय कर्णधार रोहित शर्मासह सर्व भारतीय क्रिकेटपटूंनी बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्स येथे झालेल्या प्री-सीझन फिटनेस टेस्टमध्ये उत्तीर्ण झाले आहेत. गिल आणि त्याचे सहकारी जसप्रीत बुमराह आणि जितेश शर्मा यांनीही फिटनेस मानकांची पूर्तता केली आहे.
पंजाबच्या २५ वर्षीय फलंदाजाला या टी-२० स्पर्धेसाठी भारताचा उपकर्णधार बनवण्यात आले आहे. ९ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आशिया कपसाठी भारतीय संघ लवकरच दुबईला रवाना होईल. दुलीप ट्रॉफी स्पर्धेतून माघार घेतल्यानंतर गिलची फिटनेस चाचणी अनिवार्य करण्यात आली होती. दुलीप ट्रॉफीमध्ये त्याला ताप आल्याने उत्तर विभागाचा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले होते आणि तो गेल्या काही दिवसांपासून त्याच्या गावी विश्रांती घेत होता.
BCCI अध्यक्षांना पगार किती मिळतो? जाणून घ्या त्यांच्या कमाईचा फंडा!
पीटीआयला मिळालेल्या माहितीनुसार, सेंटर ऑफ एक्सलन्समधील चाचण्या कोणत्याही अडचणीशिवाय उत्तीर्ण झालेल्या इतर खेळाडूंमध्ये मोहम्मद सिराज, यशस्वी जयस्वाल, वॉशिंग्टन सुंदर आणि शार्दुल ठाकूर यांचा समावेश आहे. आशिया कपसाठी जयस्वाल आणि वॉशिंग्टन दोघेही स्टँडबाय यादीत आहेत तर शार्दुल ४ सप्टेंबरपासून सेंटर झोनविरुद्ध होणाऱ्या दुलीप ट्रॉफी उपांत्य सामन्यात पश्चिम विभागाचे नेतृत्व करण्यासाठी शहरात असेल.
कसोटी आणि टी-२० फॉर्मेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहितवर तात्काळ कामाचा ताण नाही, परंतु हा वरिष्ठ फलंदाज नोव्हेंबरमध्ये एकदिवसीय मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाला जाण्याची शक्यता आहे आणि त्यापूर्वी तो ३० सप्टेंबर, ३ आणि ५ ऑक्टोबर रोजी कानपूरमध्ये ऑस्ट्रेलिया अ विरुद्ध भारत अ संघासाठी तीन एकदिवसीय सामने खेळू शकतो.
🚨 𝑹𝑬𝑷𝑶𝑹𝑻𝑺 🚨
The pre-season fitness tests at the BCCI Centre of Excellence in Bengaluru saw all Indian cricketers clear the challenge, with Rohit Sharma looking strong, Shubman Gill showing positive signs, and Prasidh Krishna making an impression. 💪🏼#TeamIndia #Cricket… pic.twitter.com/oSQCkOCUzW
— Sportskeeda (@Sportskeeda) August 31, 2025
याची अद्याप पुष्टी झालेली नाही परंतु रोहित सेंटर ऑफ एक्सलन्स येथे प्रशिक्षणासाठी आणखी काही दिवस शहरात राहण्याची शक्यता आहे. आशिया कप संघातील इतर सदस्य जसे की अर्शदीप सिंग, हर्षित राणा, कुलदीप यादव आणि रियान पराग (स्टँडबाय) यांनी आधीच त्यांच्या संबंधित प्रादेशिक संघांसाठी दुलीप ट्रॉफीच्या उपांत्यपूर्व फेरीत खेळले आहे आणि आता त्यांना वेगळी फिटनेस चाचणी द्यावी लागणार नाही.
स्टँडबाय खेळाडूंमध्ये असलेला यष्टीरक्षक-फलंदाज ध्रुव जुरेल पाठीच्या दुखापतीमुळे दुलीप ट्रॉफीच्या उपांत्यपूर्व फेरीतून बाहेर पडला आणि मध्य विभागाचा कर्णधार अजूनही वैद्यकीय पथकाच्या निरीक्षणाखाली आहे.