'मिसेस मुख्यमंत्री' मालिकेतून आणि ' बिग बॉस मराठी ४' च्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या घराघरात पोहोचलेल्या अमृता धोंगडेने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले. कायमच आपल्या निखळ सौंदर्यामुळे चर्चेत राहणाऱ्या अमृताने चाहत्यांसोबत इन्स्टाग्रामवर नवा लूक शेअर केला आहे. ज्यामुळे तिच्या सौंदर्याची चर्चा होत आहे..
Amruta Dhongade Glamourous
कायमच आपल्या दमदार अभिनयातून महाराष्ट्रातल्या घराघरात चर्चेत राहिलेल्या अमृताने इन्स्टाग्रामवर खूप सुंदर फोटोशूट शेअर केले आहे. ज्यातील तिच्या सौंदर्याची आणि लूकचे चाहत्यांकडून जोरदार कौतुक केले जात आहे.
शेअर केलेल्या फोटोंमध्ये अमृताने सुंदर स्टायलिश साडी नेसून खूप सुंदर फोटोशूट केले आहे. तिच्या सौंदर्याची चाहत्यांवर भुरळ पडली असून तिच्या सौंदर्याचे चाहते कौतुक करताना दिसत आहेत.
मराठमोळे दागिने, केसांत गजरा माळून आणि लूकला साजेसा मेकअप करत अभिनेत्रीने कॅमेऱ्यासमोर सुंदर फोटोशूट केले आहे. सध्या अमृताच्या फोटो पोजेसची चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा होत आहे.
सौंदर्याच्या जोरावर चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या अमृताच्या फॅशनची चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा होत आहे. तिने शेअर केलेल्या फोटोंमध्ये कॅमेऱ्यासमोर जबरदस्त फोटो पोजेस दिले आहेत.
अमृताने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव केला जात असून लाईक्स आणि कमेंट्सचा देखील वर्षाव केला जात आहे.