शंभरहून अधिक गुन्हे दाखल असलेल्या सराईताला ठोकल्या बेड्या; अलंकार पोलिसांची मोठी कारवाई
काय नेमकं प्रकरण?
या प्रकरणात हत्या झालेल्या चाळीस वर्षे व्यक्तीचे नाव परेश टोलाराम पाटील असे आहे. 12 मे रोजी पावणे नऊ वाजताच्या सुमारास दुचाकीवरून वसई येथे कामावर परेश जात असताना वाशिंद-अंबाडी रोड शेडगाव फाटा या दरम्यान गाव तलावा जवळ अज्ञात व्यक्तीने हत्या केल्याची माहिती समोर आली होती. अज्ञात व्यक्तीने हत्यार आणि डोक्यावर वार करत गंभीर जखमी करून परेशची हत्या केली होती. याप्रकरणी त्याचा भाऊ नरेश पाटील वय 37 याने हत्येची फिर्याद दिली होती. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करायला सुरुवात केली.
पोलिसांनी 200 सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी केली असता आणि तांत्रिक विश्लेषणाचे आधारे तपास करून आरोपींनी गुन्हा करताना वापरलेल्या वाहनाचा क्रमांक प्राप्त केला. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणातील आरोपी राकेश भगवान पाटील, प्रेमजीत मधुकर घरत, दक्षत भानुकांत भोईर सर्व राहणार आगरवाडी केळवा जिल्हा पालघर यांना अटक केली. पोलिसांनी त्यांची सखोल चौकशी केल्यावर आरोपींनी हत्येची कबुली दिली आहे.
या प्रकरणात मृतक परेशाचा सख्खा भाऊ नरेश टोलाराम पाटील यांनी आरोपींना मारण्याची सुपारी दिल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी नरेशला देखील अटक केली असून त्याने हत्तीच्या गुन्ह्याची कबुली दिली.
हत्या करण्यामागचं कारण काय?
नरेशने जमिनीच्या वादातून आपल्या सख्ख्या भावाची हत्तीची सुपारी दिली होती. वृत्त परेश व आरोपी नरेश त्यांची सामायिक शेतजमीन मोठा भाऊ परेशने आपल्या नावे करून घेतली होती. घर सुद्धा त्यांनी आपल्या नावे केले होते. याचाच राग मनात धरून छोटा भाऊ नरेश याने दहा लाख रुपयांची आपल्या भावाच्या हत्येची सुपारी केळवा पालघर येथील गुंडांना दिली होती. आणि त्या गुंड यांनी परेशची हत्या केली. या प्रकरणाने भिवंडी तालुक्यात भीतीचे वातावरण असून पोलीस पुढील कारवाई करत आहे.
Ahilyanagar Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; एसटी खोल खड्यात… , 2 ठार
Ans: हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव परेश टोलाराम पाटील होते.
Ans: सामायिक जमीन आणि घर नावावर केल्याच्या रागातून हत्या घडवल्याचा आरोप आहे.
Ans: 200 सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने पोलिसांनी आरोपींना अटक केली.






