पावसाक ऋतूला सुरुवात झाल्यानंतर वातावरणात गारवा निर्माण होतो. थंड वातावरणात सगळ्यांचं गरमागरम आणि टेस्टी पदार्थ खाण्याची खूप जास्त इच्छा होते. अशावेळी विकतचे पदार्थ आणून खाल्लेले जातात. पण नेहमीच तेलकट किंवा तिखट पदार्थ खाण्याऐवजी घरी बनवलेले मराठमोळे पदार्थ खावेत. हे पदार्थ केवळ चवीसाठी नाहीतर आरोग्य सुधारण्यासाठी सुद्धा मदत करतात. प्रत्येक घरात पारंपारिक पदार्थ अतिशय आवडीने बनवले जातात. चला तर जाणून घेऊया पावसाळ्यात कोणते पदार्थ आवर्जून खायला हवेत. (फोटो सौजन्य – istock)
पावसाळ्यात आवर्जून खायला हवेत 'हे' मराठमोळे पारंपरिक पदार्थ, जेवणाची वाढेल रंगतदार चव

गरमागरम पिठलं भाकरी हा पदार्थ पावसाळ्यातील सगळ्यांचा अतिशय आवडीचा पदार्थ आहे. बेसन आणि मसाल्यांचा वापर करून बनवलेले पिठलं चवीला अतिशय सुंदर लागते.

शरीरात ऊबदारपणा टिकून राहावा यासाठी कढीभात आवडीने खाल्ला जातो. आंबट ताक, लसूण मिरचीची फोडणी देऊन बनवलेली कढी जेवणाची चव रंगतदार करते.

पावसाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर सगळ्यात पहिली आठवण कांदाभजीची होते. कुरकुरीत आणि गरमागरम कांदाभजी सगळ्यांचं खायला खूप जास्त आवडते.

जेवण बनवण्याचा कंटाळा आल्यानंतर सगळ्यात पहिला आठवणीत येणारा पदार्थ म्हणजे खिचडी. मुगडाळ आणि इतर विविध पदार्थांचा वापर करून बनवलेली खिचडी पचनास अतिशय हलकी असते.

निखाऱ्यावर किंवा गॅसवर भाजलेल्या वांग्यांचे भरीत सगळेच खूप आवडीने खातात. गरमागरम भाकरी आणि वांग्याचं भरीत हे कॉम्बिनेशन अतिशय सुंदर लागते.






