( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Eva Grover Hyder Ali Khan: ‘लोकप्रिय टीव्ही मालिकांमध्ये काम केलेली अभिनेत्री इव्हा ग्रोव्हर तिच्या वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. तिला आयुष्यातीस अनेक वर्ष हिंसाचार आणि मारहाणीचा सामना करावा लागला होता. अलीकडेच एका मुलाखतीत तिने याबद्दल खुलासा केला आहे.
आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे, इव्हा ग्रोव्हरने आमिर खानचा सावत्र भाऊ हैदर अली खानसोबत फक्त १८ दिवस डेटिंग केले आणि त्यानंतर त्यांनी लग्न केले. अभिनेत्रीच्या म्हणण्यानुसार, तिचा नवरा तिला इंटिमेट क्षणांमध्ये मारहाण करायचा, ज्यासाठी ती अनेक वर्षे स्वतःला दोष देत राहिली. इवा ग्रोव्हरने हेही सांगितले की तिच्या पतीला स्किझोफ्रेनियाचा आजार होता.
अभिनेत्री इव्हा ग्रोव्हर नुकत्यात दिलेल्या एका मुलाखतीत आपल्या लग्नातील वेदना सांगताना भावुक झाली. सिद्धार्थ कन्नन यांच्याशी बोलताना इवा ग्रोव्हर म्हणाली, “मी हैदर अला खानला एका मित्राच्या माध्यमातून भेटले. तो कतार एअरवेजमध्ये केबिन क्रू मेंबर म्हणून काम करायचा आणि चांगला पगार मिळवायचा. मी एक अभिनेत्री होते आणि महिन्याच्या शेवटी चांगला पगार मिळवायचे. माझ्या बँक खात्यात चांगली रक्कम होती. आमच्याकडे पैशांची कमतरता नव्हती, पण तो वेगळ्या धर्माचा होता आणि माझ्या आईने त्याला कधीच स्वीकारले नसते. आम्ही डेटिंग सुरू केल्याच्या अवघ्या १८ दिवसांनंतर त्याने मला लग्नाची मागणी घातली. त्यावेळी मी खूप आनंदी होते.”
इव्हा पळून जाऊन केलं लग्न
“मी त्याच्या प्रेमात वेड्यासारखी पडले. दुसरा विचार न करता मी त्याच्यासोबत पळून गेले. आम्ही लग्न केले आणि मागे वळून पाहिले नाही. यामुळे माझी आई खूप दुःखी झाली होती आणि मला म्हणाली, ‘माझ्यासोबत काहीही झाले तरी, या घरात परत येऊ नकोस.'” अभिनेत्री पुढे म्हणाली, “माझी आई बरोबर होती. कदाचित हे लग्न यशस्वी झाले असते, तर तिलाही काही वाटले नसते, पण तसे झाले नाही.”
येथे इव्हाने स्पष्ट केले, “तो दारू प्यायचा, दोहामध्ये राहायचा, तो देखणा होता, त्यामुळे त्याला सांगण्यात आले की तो इंडस्ट्रीमध्ये खूप काम करू शकतो आणि आपण एक स्टार बनू शकतो असा त्याचा विश्वास बसू लागला. त्याने नोकरी सोडल्याचे सांगितले. त्याची चिडचिड अधिकच वाढली होती. त्याला आधीपासूनच स्किझोफ्रेनिया होता, पण तो अधिकच बळावला.”
इंटिमेट होतानाही करायचा मारहाण
अभिनेत्री पुढे म्हणाली, “इंटिमेटमध्ये मला मारायला त्याला आवडायचे; ही त्याची सवय होती, पण लग्नाआधी मला हे माहीत नव्हतं. आमच्या लग्नाच्या तिसऱ्या दिवशीच मला हे कळलं आणि हळूहळू ते वाढतच गेलं. कित्येक वर्षे मी त्यासाठी स्वतःलाच दोष देत राहिले. माझ्यातच काहीतरी चूक आहे असं मला वाटायचं.”
इव्हाने नात टिकवण्यासाठी केलं प्रयत्न
अभिनेत्री इव्हा ग्रोव्हरने सांगितले की, तिने आपले लग्न टिकवण्यासाठी खूप प्रयत्न केले, अनेक चढ-उतारांना तोंड दिले, पण ती यशस्वी होऊ शकली नाही. तिने एका मुलाला जन्मही दिला, पण त्या मुलालाही एका मोठ्या संकटाचा सामना करावा लागला. अभिनेत्री म्हणाली की, ती आपली चूक मान्य करते आणि खूप आधीच माघार घ्यायला हवी होती, पण ती वेळेवर तसे करू शकली नाही.
Kiara Adwani अगोदर ‘या’ अभिनेत्रीला करण्यात आली होती Lust Stories ची ऑफर! तरुणांच्या हृदयाची राणी
‘करिश्मा का करिश्मा’, ‘बडे अच्छे लगते हैं’, ‘शरारत’, ‘ऑफिस ऑफिस’ यांसारख्या अनेक लोकप्रिय टीव्ही मालिकांमध्ये इवा ग्रोव्हरने काम केले आहे.






