केस गळून टक्कल पडण्याची भीती वाटते? मग नियमित करा घरी बनवलेल्या बायोटीनयुक्त गोळीचे सेवन, केसांची होईल वाढ
पावसाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये महिला आणि पुरुषांना केसांसंबधित असंख्य समस्या उद्भवतात. केस गळणे, केसांमध्ये कोंडा होणे तर काहीवेळा वारंवार पावसात भिजल्यामुळे टाळूवर इन्फेक्शन होण्याची जास्त शक्यता असते. टाळूवर झालेल्या इन्फेक्शनमुळे नाजूक त्वचेवर जखम होते. त्यामुळे सर्वच ऋतूंमध्ये केसांची योग्य पद्धतीने काळजी घेणे फार आवश्यक आहे. केस हेल्दी आणि चमकदार ठेवण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेल्या विविध हेअर केअर प्रॉडक्टचा वापर केला जातो. हेअरमास्क, हेअर पॅक, हेअर सिरम तर काहीवेळा महागड्या हेअर ट्रीटमेंट सुद्धा करून घेतल्या जातात. यामुळे काहीकाळ केस अतिशय सुंदर आणि चमकदार दिसतात. पण कालांतराने केसांच्या समस्या वाढून केसांचे आरोग्य बिघडून जाते.(फोटो सौजन्य – istock)
पावसाळ्यात सतत फेसवॉश करणे योग्य की अयोग्य? जाणून घ्या चेहऱ्यावर रॅश आणि लालसरपणा वाढण्याची कारणे
केसांच्या वाढत्या समस्या कमी करण्यासाठी कायमच बाजारात उपलब्ध असलेल्या केमिकल प्रॉडक्टचा वापर करू नये. केसांची वाढ केवळ हेअर केअर प्रॉडक्टच्या वापरामुळे नाहीतर पौष्टिक आहार आणि शांत झोप घेणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे. बऱ्याचदा केस गळण्यास सुरुवात झाल्यानंतर महिला वेगवेगळ्या गोळ्या किंवा सप्लिमेंट्स घेतात. पण यामुळे किडनीच्या आरोग्यावर परिणाम होतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला केसांच्या वाढीवर सकारात्मक परिणाम करण्यासाठी बायोटीनयुक्त गोळ्या बनवण्याची सोपी कृती सांगणार आहोत. या गोळ्या नियमित खाल्ल्यास केसांवरील नैसर्गिक चमक कायम टिकून राहील आणि केस चमकदार होतील.
छोट्या भांड्यात संत्र्याचा गर काढून घ्या. कढई गरम करून त्यात संत्र्याचा गर आणि बेरीजचे मिश्रण घालून मंद आचेवर व्यवस्थित शिजवून घ्या. त्यानंतर त्यात जिलेटिन घालून चमच्याने सतत मिक्स करत राहा. याशिवाय गोड चवीसाठी मध किंवा मेपल सिरपचा वापर करू शकता. त्यानंतर बायोटीन टॅब्लेट बारीक करून घ्या. तयार केलेल्या मिश्रणात लिंबाचा रस घालून पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करा. तयार केलेले मिश्रण सिलिकॉन मोल्डमध्ये ओतून २ ते ३ तासांसाठी फ्रिजमध्ये सेट करण्यासाठी ठेवा. तयार केलेल्या गोळ्या हवा बंद डब्यात भरून ठेवा. यामुळे गोळ्या लवकर खराब होणार नाहीत आणि जास्त वेळ टिकतील.
Skin Care Tips: वाढत्या वयातही त्वचा राहील तजेलदार, ‘या’ सोप्या टिप्स करा फॉलो; चेहरा चमकेल
केसांच्या वाढीसाठी केवळ बायोटीनयुक्त गोळ्याच नाहीतर आहारात बदाम, अक्रोड, शेंगदाणे, सुर्य फुलाच्या बीया, मशरूम, रताळे, पालक, ब्रोकोली, अवाकाडो, डाळी आणि शेंगा इत्यादी पदार्थांचे सेवन करणे आवश्यक आहे. केसांची गुणवत्ता सुधारण्यासाठी आवळा आणि कढीपत्त्याचे आवर्जून सेवन करावे. यामध्ये असलेले विटामिन सी आणि इतर आवश्यक पोषक घटक केस लांबलचक करण्यास मदत करतात. त्यामुळे नियमित एक आवळा किंवा कढीपत्याची चटणी खावी.






