मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. मुंबईला स्वप्ननगरी देखील म्हणतात. या नगरीत आपलं एक घर असाव असं प्रत्येकाला वाटतं. मुंबईत सेलिब्रिटींची अनेक महागडी घरं आहेत. उद्योगपतींपासून ते बॉलिवूड स्टारपर्यंत मुंबईत अनेकांची महाग घरं आहेत. या आलिशान घरांची किंमत देखील प्रचंड आहे. पण तुम्हाला माहित आहे का मुंबईतील सर्वात महागडी घरे कोणती आहेत आणि या घरांचे मालक कोण आहेत? चला या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest)
Expensive House In Mumbai: 'ही' आहेत मुंबईतील सर्वात महाग घरं; जाणून घ्या किंमत आणि मालकांची नावं

अँटिलिया : रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी यांचे घर अँटिलिया घर मुंबईत आहे. या घराची किंमत 15,000 कोटींहून अधिक असल्याचा अंदाज आहे. केवळ मुंबईतीलच नाही तर संपूर्ण भारतातील अँटिलिया हे सर्वात महागडे घर आहे.

लिंकन हाऊस: सायरस पूनावाला यांचे घर लिंकन हाऊस दक्षिण मुंबईतील ब्रीझ कँडी भागात आहे. त्याची किंमत 750 कोटींहून अधिक आहे आणि हे शहरातील सर्वात आलिशान घरांपैकी एक आहे.

जातिया हाऊस: कुमार मंगलम बिर्ला यांचे घर जातिया हाऊस, मलबार हिल्स, मुंबई येथे आहे. मॅजिकब्रिक्सनुसार या घराची किंमत 425 कोटी रुपये आहे.

गुलिता : ईशा अंबानी आणि आनंद पिरामल यांचे गुलिता घर मुंबईत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे घर 2012 मध्ये 452 कोटी रुपयांना खरेदी करण्यात आले होते.

मन्नत: बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानचे घर मन्नत देखील मुंबईत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, किंग खानच्या घराची किंमत 200 कोटी रुपये आहे.

जलसा: मेगास्टार अमिताभ बच्चन यांचे जलसा देखील मुंबईत आहे. अमिताभ बच्चन यांच्या घराची किंमत 112 कोटी रुपये आहे. अमिताभ बच्चन यांचे जलसा मुंबईतील महागड्या घरांपैकी एक आहे.






