RCB Vs SRH Live Streaming (फोटो- ट्विटर)
एसआरएचने आरसीबीला दिलेळे 256 रन्सचे टार्गेट
पॉवर प्लेमध्ये आरसीबीने गमावल्या 2 विकेट्स
एसआरएच पॉईंट्स टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावर
Tata IPL 2026 SRH Vs RCB Live Updates: आज हैदराबादच्या राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध सनरायझर्स हैदराबादमध्ये सामना खेळवला गेला. आयपीएलच्या साखळी सामन्यांचा हा शेवटचा आठवडा आहे. एसआरएचने इशान किशन आणि अभिषेक शर्माच्या खेळीच्या जोरावर आरसीबीला 256 रन्सचे टार्गेट दिले होते. दोन्ही संघ क्वालिफाय झाले आहेत. टॉप 2 साठी एसआरएचचा सामना महत्वाचा आहे. अखेर या सामन्यात एसआरएचने आरसीबीवर 55 रन्सने विजय मिळवला आहे. एसआरएचने सामना जिंकला असला तरी देखील त्यांना टॉप 2 मध्ये जाता आलेल नाही. एसआरएच पॉईंट्स टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे. आता चौथ्या स्थानी येणाऱ्या संघासओबात एसआरएचचा संघ एलिमिनेटर खेळणार आहे.
आरसीबीची फलंदाजी
एसआरएचने दिलेल्या 256 रन्सचे बलाढ्य टार्गेट पूर्ण करण्यासाठी आरसीबीकडून डावाची सुरूवात विराट कोहली आणि वेंकटेश अय्यरने केली. मागील सामन्याप्रमाणे वेंकटेश अय्यरने आक्रमक खेळी केली. एसआरएचच्या गोलंदाजांची धुलाई केली. अखेर 4 सिक्स आणि 4 फोर मारून 44 रन्सवर असताना अय्यर आउट झाला. अय्यर आउट झाल्यावर फॉर्ममध्ये असणारा देवदत्त पाडीकल खेळण्यासाठी आला. विराट कोहलीने सावध सुरूवात केली होती. मात्र तो मोठी खेळी करू शकला नाही. विराट कोहली 15 रन्स करून आउट झाला. देवदत्त पडीकलने 21 रन्स केल्या. कर्णधार रजत पाटीदारने शानदार 56 रन्सची खेळी केली.
Eshan Malinga with the breakthrough! 👊#RCB lose their first wicket ☝️ Updates ▶️ https://t.co/ZcxjefgalG#TATAIPL | #KhelBindaas | #SRHvRCB pic.twitter.com/PlPXTBcXW6 — IndianPremierLeague (@IPL) May 22, 2026
एसआरएचची गोलंदाजी
एसआरएचच्या गोलंदाजांनी पॉवर प्लेमध्ये आरसीबीकडून आक्रमक खेळी करणाऱ्या वेंकटेश अय्यरला 44 रन्स वर आउट करण्यात यश मिळवले. एशान मलिंगाने त्याला आउट केले. तर साकीब हुसेनने विराट कोहलीला आउट केले. एशान मलिंगाने पडीकलला आउट केले. ट्रेविस हेडने रजत पाटीदारला आउट केले.
एसआरएचची फलंदाजी
एसआरएचचा कर्णधार पॅट कमिन्सने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. अभिषेक शर्मा आणि ट्रेविस हेडने एसआरएचची सुरुवात केली. ट्रेविस हेडने पॉवर प्ले मध्ये शानदार सुरूवात केली त्यावेळेस अभिषेक शर्मा एका बाजूने सावकाश डाव सांभाळत होता. ट्रेविस हेड 26 रन्स करून आउट झाला. तर त्यानंतर खेळण्यासाठी इशान किशन मैदानात आला. अभिषेक शर्माने शानदार आक्रमक खेळी करत अर्धशतक लगावले. तो 56 रन्स करून आउट झाला. नंतर इशान किशनने आणि हेनरी क्लासेनने एसआरएचला 200 च्या पार पोहोचवले. हेनरी क्लासेनने शानदार अर्धशतक केले. तो 51 रन्स करून आउट झाला. किशन आणि क्लासेनने 100 पेक्षा जास्त रन्सची पार्टनरशिप केली. शेवटच्या ओव्हर्समध्ये इशान किशन आणि नितीश कुमार रेड्डीने शानदार फलंदाजी करत एसआरएचला 250 पार पोहोचवले.
आरसीबीची गोलंदाजी
आरसीबीकडून गोलंदाजीची सुरूवात भुवनेश्वर कुमार आणि जोश हेझलवूडने केली. पॉवर प्लेमध्ये गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. रसिख डारने आक्रमक खेळणाऱ्या ट्रेविस हेडची महत्वाची विकेट पटकावली. पाठोपाठ लेग स्पिनर सुयश शर्माने अभिषेक शर्माला आउट केले. कृणाल पंड्याने आरसीबीसाठी घातक ठरणारी जोडी फोडली. त्याने क्लासेनला 51 रन्सवर आउट केले.
सनरायझर्स हैदराबाद : अभिषेक शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), हेनरिक क्लासेन, सलील अरोरा, स्मरण रविचंद्रन, नितीश कुमार रेड्डी, पॅट कमिन्स (कर्णधार), शिवांग कुमार, इशान मलिंगा, साकिब हुसेन, प्रफुल हिंगे.
SRH Vs RCB Live: आज लढाई टॉप 2 ची! पॅट कमिन्सने जिंकला टॉस; घेतला ‘हा’ निर्णय
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू: जेकब बेथेल, विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार (कर्णधार), जितेश शर्मा (विकेटकीपर), टिम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, जोश हेजलवुड, सुयश शर्मा.






