वसई-विरारमध्ये फेरीवाल्यांच्या पुनर्वसनाच्या मागणीसाठी आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. रेल्वे स्टेशनपासून १५० मीटर परिसरातील फेरीवाल्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर फेरीवाले आक्रमक झाले आहेत. फेरीवाला समितीने महापालिकेला निवेदन देत “आधी पुनर्वसन करा, मगच कारवाई करा” अशी मागणी केली आहे. प्रशासनाने सोमवारपर्यंत सकारात्मक निर्णय न घेतल्यास २६ मे रोजी अधिकृत फेरीवाल्यांचा महापालिकेवर भव्य मोर्चा आणि ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.