ट्विशा शर्मा मृत्यू प्रकरण (फोटो- सोशल मिडिया)
ट्विशा शर्माच्या पतीला भोपाळ पोलिसांनी जबलपूरमधून उचलले
मध्यप्रदेश हायकोर्टाने दुसऱ्यांदा पोस्ट पोर्टमला दिली परवानगी
दिल्ली एम्सचे डॉक्टर करणार पोस्ट पोर्टम
Twisha Sharma Husband Arrested: मध्यप्रदेशमधील ट्विशा शर्माच्या मृत्यू प्रकरणात एक नवीन माहिती समोर आली आहे. घटना घडली तेव्हापासून ट्विशा शर्माचा नवरा अटकेच्या (Crime) भीतीमुळे फरार झाला होता. मात्र आज अचानक समर्थ सिंग जबलपूर कोर्टात आत्मसमर्पण करण्यासाठी हजर झाला. मात्र त्याने आपली ओळख लवपण्यासाठी तोंडावर मास्क आणि गॉगल लावला होता. तो कोर्टात हजर होताच त्या ठिकाणी काहीसा गोंधळ निर्माण झाला.
समर्थ सिंग आज अचानक जबलपूर कोर्टात हजर झाला. गेले 10 दिवसांपासून तो फरार होता. मात्र आज अचानक त्याने आत्मसमर्पण केले. जबलपूरमध्ये समर्थ सिंगने आत्मसमर्पण केल्याचे समजताच भोपाळ पोलिसांनी त्याला जबलपूरमध्ये अटक केली. समर्थ सिंगला ताब्यात घेताना त्याचा पेहराव बदलण्यात आला आहे. त्याला घेऊन पोलिस भोपाळकडे रवाना झाले आहेत.
ट्विशा शर्माच्या कुटुंबीयांनी दुसऱ्यांदा पोस्ट पोर्टम करण्याची मागणी केली होती. मात्र भोपाळ कोर्टाने त्यांची याचिका फेटाळून लावली होती. मात्र त्यानंतर मध्यप्रदेश हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यानंतर हायकोर्टाने ट्विशा शर्मा मृत्यू प्रकरणात संशयास्पद मृत्यूचा छडा लावण्यासाठी मृतदेहाचे दुसऱ्यांदा पोस्ट पोर्टम करण्याचे आदेश दिले आहेत.
Twisha Sharma: पुन्हा पोस्टमॉर्टमच्या मागणीला कोर्टाचा नकार; याचिका फेटाळली, आता मृतदेह…
उत्तर प्रदेशच्या नोएडा येथील रहिवाशी ट्विशा शर्माचं लग्न मध्य प्रदेशच्या भोपाळ येथील वकिल समर सिंह याच्याशी करण्यात आले होते. माहितीनुसार, समर सिंह हा माजी न्यायाधिश गिरिबाला सिंह यांचा मुलगा आहे. लग्नात ट्विशाच्या कुटुंबियांनी वर पक्षाला भरगच्च हुंडा दिला पण तरीही लग्नानंतर तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केला जात होता. याच छळाला कंटाळून तिने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. लग्नाच्या अवघ्या ५ महिन्यांतच ट्विशाने आपले आयुष्य संपवले ज्यानंतर ही घटना देशभर चांगलीच रंगली.
न्याय मिळेपर्यंत अंत्यसंस्कार नाही
ट्विशा शर्माच्या प्रकरणात अजूनही आरोपीला शिक्षा झाली नाही ज्यामुळे कुटुंबाने तिचे अंत्यसंस्कार पुढे ढकलले आहे. जोपर्यंत आमच्या मुलीला न्याय मिळत नाही तोपर्यंत अंतिम संस्कार केले जाणार नाहीत असा निर्धार ट्विशाच्या कुटुंबियांनी केला आहे. त्यातच आता ट्विशाच्या मृत्यूला ९ दिवस पालटून गेल्याने पोलिसांनी आता कुटुंबाला पत्र लिहित विशेष अपील केली आहे.






